ग्रेट मराठी न्युज (GM NEWS ), दिन विशेष वृत्त : जामनेर तहसिल कार्यालयात राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा.

0
18

जामनेर,दि.२८,मिलींद लोखंडे


भारतीय राष्ट्रीय ग्राहक दिवसा निमित्त आज सकाळी ११ वाजता तहसील कार्यालय,जामनेर येथे ग्राहक दिनाचे आयोजन करण्यात आले. यावेळी समारंभ अध्यक्ष उद्घाटक तहसीलदार नानासाहेब आगळे यांनी ग्राहक आणि ग्राहकांच्या समस्या, त्यावर उपाययोजना, दक्ष व जागरूक ग्राहक निर्माण करणे, अनुचित व्यापाराला आळा घालणे, आमिषाला ,जाहिरातीला बळी न पडणे ऑनलाइन खरेदी करताना सतर्क राहणे ,व ग्राहक संरक्षण कायदा 1986 व सुधारणा कायदा 2019 याची इत्यंभूत माहिती दिली. ग्राहक संरक्षण कायद्याने दिलेले सहा अधिकार ग्राहकांची कर्तव्य ,ही सुद्धा सांगण्यात आली जागो ग्राहक जागो हा नारा सुद्धा यावेळी देण्यात आला कार्यक्रमाला 

उपस्थित वैद्यकीय अधिकारी डॉ राजेश सोनवणे,ता अध्यक्ष डॉ उमाकांत पाटील,सचिव प्रल्हाद सोनवणे,जिल्हा सहसंघटक सौ सुषमा चव्हाण ना तहसीलदार प्रशांत निंबोलकार पुरवठा अधिकारी वैराळकर यांच्या हस्ते दीप्रज्वलनाने कार्यक्रमास प्रारंभ झाला .ग्राहक दिनानिमित्त तहसील कार्यालयात आकर्षक ग्राहक दिनानिमित्त शुभेच्छा ची रांगोळी काढण्यात आली प्रमुख पदाधिकाऱ्यांचे तहसीलदार नानासाहेब आगळे यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले सूत्रसंचालन रेशन दुकानदार संघटनेचे राजू देशपांडे यांनी केले

कार्यक्रमास सर्व रेशन दुकानदार जामनेर तालुका व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते