GM NEWS,FLASH: क्रीडा संस्कृतीच्या जोपासनेसाठी मालदाभाडी शाळेत क्रीडा सप्ताह.

0
249

जामनेर दि,१८ (मिलींद लोखंडे):- बौद्धिक विकासाबरोबरच शारीरिक विकास होऊन विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी न्यू इंग्लिश स्कूल मालदाभाडी या शाळेत शासनाच्या फिट इंडिया मोमेंट अंतर्गत क्रीडा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते . क्रीडा संस्कृतीच्या जोपासनेसाठी दिनांक 12 ते 18 डिसेंबर पर्यंत असणाऱ्या या सप्ताहात योगा, लंगडी, लगोरी, झिम्मा फुगडी, एरोबिक्स, 100 मी धावणे, संगीत खुर्ची, कवायत, कबड्डी, व्याख्याने, प्रश्नमंजुषा व क्षमता मूल्यमापन चाचण्यांचे आयोजन करण्यात आले होते.

या क्रीडा सप्ताहात विद्यार्थ्यांनी हिरीरीने भाग घेतला. या स्पर्धेसाठी शाळेतील क्रीडा प्रमुख विजय सैतवाल विज्ञान शिक्षक जी.टी.पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. क्रीडा सप्ताहाचे उद्घाटन विद्यालयाचे प्रभारी मुख्याध्यापक एस आर शिकोकार यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आर एल कोळी यांनी तर आभार श्रीमती के आर महाजन यांनी मानले. सप्ताह यशस्वीतेसाठी एन.एस.चौधरी, चित्रकला शिक्षक एन.जी.पाटील ए.बी.पाटील एन. सी.पाटील, मनोज जैन,राजू मोरे यांचेसह ग्रीन आर्मी चे सर्व सदस्य यांनी परिश्रम घेतले. स्पर्धा बघण्यासाठी गावातील आबालवृद्धांनी गर्दी केली होती. विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या चांगल्या उपक्रमाबद्दल गावकऱ्यांनी कौतुक केले आहे.