GM NEWS,Big Breaking:पहुर पोलीसांनी केल्या हातभट्टया उध्वस्त.तोंडापुर परीसरात आज सकाळ पासुन धडक कारवाई .

0
150

तोंडापूर ,ता जामनेर दि २२ ( एकनाथ कोळी ) :- तोंडापूर येथे गावठी दारूच्या हातभट्टयावर सहाय्यक पोलिस निरीक्षक राकेश सिंग परदेशी यानी आज दि २२ रोजी सकाळी ११ वाजता धाड टाकून बारा हजार रुपये किमतीची दारुचे कच्चे रसायनाच्या तिन टाक्यांची नष्ट करण्यात येवून हातभट्टि मालकावर रीतसर गुन्हा दाखल करण्यात आला तोंडापूर येथे अवैध धंदे खुले आम सुरु असून बसस्थानक परिसरात गावठी दारु देशी विदेशी दारू राजरोसपणे विक्री होत असल्याने बसस्थानक परिसरात सट्टा पत्ता यामुळे भांडण तंटे वाढ होत असल्यामुळे व गावातील तरुण वर्गाच्या ५३ आन लाईन तक्रारी दखल घेत आज दि २२ रोजी सकाळी ११ तोंडापूर येथील धरणाच्या बाजूला पाटाच्या शेजारी लताबाई राजू मस्के याच्या गावठी दारु च्या हात भट्टी सुरू असल्याची गुप्त माहिती मिळाल्याने हातभट्टि वर धाड टाकली असता जागेवर तिन टाक्यांमध्ये कच्चे रसायन (रक्कम बारा हजार रुपयाच्या मालाचे ) व हातभट्टि सुरू असल्याने भट्टी वर काम करनाऱ्या गणेश युवराज गायकवाड याना ताब्यात घेवून तिन टाक्यांमधिल रसायन व सामुग्री व गावठी दारू भट्टी नष्ट करण्यात आले या यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक राकेश सिंग परदेशी पो का जितुसिंग परदेशी पो अनिल राठोड होमगार्ड अमोल सिरसागर यांनी कार्यवाही करण्यात आली पो का नवल हाटकर याच्या फिर्यादी वरुन लताबाई मस्के व गणेश गायकवाड याच्या विरूध्द पहुर पोलिस स्टेशन ला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.