GM NEWS,FLASH:युवा वर्गासाठी आनंदाची बातमी : – जळगांव जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे 26 डिसेंबर रोजी आयोजन.महोत्सवात युवकांना विविध कला सादर करण्याची संधी .

0
270

जळगाव, दि. 23, ( मिलींद लोखंडे ) :- क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जळगाव यांचेमार्फत युवकांच्या विविध कला गुणांना वाव देवून त्यांच्यातील सुप्त गुणांना युवा महोत्सवाच्या माध्यमातून प्रदर्शित करण्याची संधी क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणेद्वारे प्रतिवर्षी उपलब्ध करुन दिली जात आहे.
युवा महोत्सवासाठी नियम व अटी अशा आहेत. लोकनृत्यासाठी 20 कलाकार आवश्यक असून कार्यक्रम सादर करण्यासाठी 15 मिनिटे अधिक स्टेज व्यवस्थेसाठी 5 मिनिटे मिळतील.
लोकगीतांसाठी 10 कलाकार आवश्यक असून कार्यक्रम सादर करण्यासाठी 7 मिनिटे अधिक स्टेज व्यवस्थेसाठी 4 मिनिटे मिळतील.
एकांकीका (इंग्रजी किंवा हिंदी) साठी 12 कलाकार आवश्यक असून कार्यक्रम सादर करण्यासाठी 45 मिनिटे अधिक स्टेज व्यवस्थेसाठी 10 मिनिटे मिळतील.
शास्त्रीय गायन (हिंदुस्थानी/कर्नाटकी) साठी 1 कलाकार असणे आवश्यक असून कार्यक्रम सादर करण्यासाठी 15 मिनिटे अधिक स्टेज व्यवस्थेसाठी 5 मिनिटे मिळतील.
शास्त्रीय वाद्य :- सितार, बासरी व विणासाठी – प्रत्येकी 1 कलाकार व कार्यक्रम सादर करण्यासाठी 15 मिनिटे अधिक स्टेज व्यवस्थेसाठी 5 मिनिटे मिळतील.
तबला, मृदुंग, होर्मोनियम (लाईट), गिटार (भारतीय/पाश्चिमात्य) साठी 1 कलाकार व कार्यक्रम सादर करण्यासाठी 10 मिनिटे अधिक स्टेज व्यवस्थेसाठी 5 मिनिटे मिळतील.
शास्त्रीय नृत्य संगीत:- मणिपुर, ओडिसी, भरतनाट्यम, कथ्थ्क, कुचीपुडी साठी- 1 कलाकार व कार्यक्रम सादर करण्यासाठी 15 मिनिटे अधिक स्टेज व्यवस्थेसाठी 5 मिनिटे मिळतील. तर वक्तृत्व (इंग्रजी किंवा हिंदी) 1 कलाकार व कार्यक्रम सादर करण्यासाठी 4 मिनिटे अधिक स्टेज व्यवस्थेसाठी 5 मिनिटे मिळतील.
युवा महोत्सवाच्या सुचना, नियम अटी व अधिक माहितीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी, जळगाव यांच्या कार्यालयाच्या 0257-2237080 या दुरध्वनीवर संपर्क साधावा. असे आवाहन ‍जिल्हा क्रीडा अधिकारी, जळगाव श्री. मिलींद दिक्षीत यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.