GM NEWS ,FLASH: भाजपा हा कार्यकर्त्यांच्या बळावर मोठा झालेला पक्ष . – आमदार गिरीषभाऊ महाजन .

0
358

जामनेर ,दि. २६ ( ईश्वर चौधरी ) : – भारतीय जनता पार्टी हा देशातला सर्वात मोठा पक्ष असून त्याच बरोबर राज्यातही आहे हे सर्व सर्व सामान्य कार्यकर्त्यांच्या जोरावर भाजपा पक्ष बळकट झालेला आहे, असे प्रतिपादन माजी मंत्री तथा आ.गिरीषभाऊ महाजन यांनी जामनेर येथे भाजपा तालुकाध्यक्ष निवड बैठकीत बोलताना कार्यकर्त्यांसमोर केले. जामनेर तालुका भाजपा अध्यक्ष निवडीसाठी शहरातील बाबाजीराव मंगल कार्यालयामध्ये प्रमुख कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये भाजपा तालुकाध्यक्षपदासाठी एकूण १९ अर्ज आले होते. मात्र अठरा जणांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे तालुकाध्यक्षपदी चंद्रकांत रामधन बाविस्कर यांची दुसऱ्यांदा भाजपा तालुका अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी चंद्रकांत बाविस्कर यांचा माजी मंत्री तथा आमदार गिरीषभाऊ महाजन यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी अ‍ॅड.शिवाजी सोनार, , जिल्हा उपाध्यक्ष गोविंद अग्रवाल, माजी जि.प. अध्यक्ष दिलीप खोडपे, निवडणूक निरिक्षक म्हणून वरणगाव येथील नगराध्यक्ष सुनील काळे, नगरपालिका उपनगराध्यक्ष अनेक शेख, नपा गटनेते डॉ. प्रशांत भोंडे, आत्मा समिती अध्यक्ष जितेंद्र पाटील, सर्व प.स जि.प., ज्येष्ठ नेते छगन झाल्टे, शंकर मराठे, नाजिम पार्टी, बाजार समितीचे सभापती संजय देशमुख, शेतकरी संघ संचालक रमेश नाईक, नवल राजपूत, जोतमल तवर, बालू नाईक, शेखर काळे, जे.के. चव्हाण, बाबुराव घोंगडे,राजधर पांढरे, अरविंद देशमुख, रामेश्वर पाटील, नगरसेवक प्रा.शरद पाटील, बंटी वाघ, अतिश झाल्टे,बाबुराव हिरवळे, शितेश साठे, मार्केट कमिटी संचालक तुकाराम निकम आदी उपस्थित होते. आ. महाजन पुढे म्हणाले की, भाजपाचे ३ खासदार लोकसभेत होते त्याचे आता ३०३ झाले आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रात शंभराच्यावर आमदार विधानसभेत आहे. त्यामुळे भाजपा आजही राज्यात मोठा पक्ष आहे. महाराष्ट्रामध्ये महाआघाडी सरकार स्थापन झाले आहे ते किती दिवस टिकते हे येणारा काळात दिसणार आहे. मात्र आपण सर्व भाजपाच्या शंभर टक्के गावे करण्यासाठी सर्वांनी काम करावे कारण आजही आपण बऱ्याच स्थानिक संस्था भाजपाच्या ताब्यात असून मोठ्या प्रमाणावर विकास कामे चालूच ठेवणार असल्याचे यावेळी त्यांनी आपल्या भाषणात बोलताना दिली. भाजपा तालुका अध्यक्ष निवडीमध्ये हे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सुनील काळे यांनी कामकाज पाहिले. त्याचबरोबर त्यांच्यासोबत तुकाराम निकम होते. कार्यक्रमांमध्ये भाजपचे प्रमुख पदाधिकारी, जि.प, पं.स. सदस्य, नपा नगरसेवक यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते. सूत्रसंचालन नवल राजपूत यांनी केले.