ग्रेट मराठी न्युज(GM NEWS),नविन वर्षाची गोड बातमी: जामनेर तालुका क्रीडा क्षेत्राच्या शिरपेचात मानाचे मोरपंख ! वाडी गावाचा भुमीपुत्र अर्जुन प्रकाश भिल याने पटकविले आंतरराष्ट्रीय ॲथेलिटक्स स्पर्धेत सुवर्ण पदक नेपाळ देशात केले भारताचे नेतृत्व.

0
32

जामनेर,दि.१,जानेवरी ( मिलींद लोखंडे ) : – युथ गेम्स प्रमोशन & डेव्हलपमेंन्ट फेडरेशन ऑफ इंडिया इंटरनॅशनल चॅम्पियनशिप २०२३-२४ क्रीडा स्पर्धा नेपाळ देशात नुकतीच पार पडली असुन या क्रीडा स्पर्धेत इंटरनॅशनल ॲथेलेटिक्स चॅम्पियनशिप गेम्स मध्ये भारत देशाचे नेतृत्व करत अर्जुन प्रकाश भिल याने ५००० मीटर अंतर ठराविक वेळत गाठत प्रथम क्रमांकाचे सुवर्णपदक प्राप्त केले आहे.

                           अर्जुन प्रकाश भिल हा जामनेर तालुक्यातील वाडी गावचा भुमीपुत्र असुन ह . मु .ऐनपुर ता.रावेर येथे शिक्षण घेत आहे.अर्जुन भिल याने यापुर्वी अहमदाबाद येथे झालेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत अँथेलिटिक्स स्पर्धेत ५ किलोमिटर अंतर ठराविक वेळेत गाठत विजय प्राप्त केला होता त्याच्या या खेळाचे प्रदर्शन पाहुन नेपाळ देशात झालेल्या आंतरराष्ट्रीय २०२३-२४ क्रीडा स्पर्धेसाठी त्याची निवड झाली होती. रंगशाला स्टेडीयम पोखरा,नेपाळ या ठीकाणी ही क्रीडा स्पर्धा २१ ते २५ डिसेंबर पर्यंत आयोजित केली होती. या क्रीडा स्पर्धेत अर्जुन प्रकाश भिल याने ५००० मीटर धावण्याच्या स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त करत सुवर्ण पदक प्राप्त केले आहे. अर्जुन प्रकाश भिल याचे कुटुंब मोल मजुरी करणारे असुन अतिशय खडतर प्रवास करत संघर्ष करत अर्जुन याने वाडी गावासह जामनेर तालुका,महाराष्ट्र राज्य आणी भारत देशाचे नाव उज्वल केले आहे. देशासाठी त्याने केलेल्या दैदिप्यमान कामगिरी बद्दल राज्याचे ग्रामविकास मंत्री ना.गिरीशभाऊ महाजन यांच्यासह आदिवासी एकता परिषद जामनेर तालुका आणि जिल्हा शाखा व सर्व जनतेने त्याचे अभिनंदन केले आहे.आमच्या G.M NEWS परिवरा च्या वतीने सुद्धा अर्जुन याचे मनपुर्वक अभिनंदन !


आदिवासी एकता परिषद जामनेर तालुका व जिल्हा शाखेच्या वतीने अभिनंदन करतांना जिल्हाध्यक्ष सुधाकर सोनवणे यांच्यासह पदाधिकारी