*ग्रेट मराठी न्युज (GM NEWS ), गुन्हे वार्ता :* *लाकडाची बेकायदेशीर चोरटी वाहतुक करणारे वाहन पाठलाग करत पकडले,वाहन चालक फरार* *५ लाख किंमतीचे खैर प्रजातीचे लाकूड जप्त* *यावल वनविभागाची धडक कारवाई.*

0
43

जळगांव,३( मिलींद लोखंडे) : – जिल्ह्यातील यावल वनविभागाला मिळालेल्या गुप्त माहिती नुसार वनपाल गस्ती पथक व रेंज स्टाफ यावल पश्चिम यांनी नायगाव किनगाव रस्त्यावर २ डिसेंबरच्या रात्री भरधाव वेगाने जाणाऱ्या बोलेरो पीकप गाडीचा पाठलाग करत ५ लाख रुपये किमतीचा खैर प्रजाती लाकडाचा बेकायदेशीर साठा जप्त केला आहे. अंधाराचा फायदा घेत वाहन चालक मात्र फरार झाला आहे.

याबाबत सविस्तर असे की,दि.२ डिसेंबरच्या रात्री मंगळवार रोजी मिळालेल्या गुप्त बातमी वरून वनपाल गस्ती पथक व रेंज स्टाफ यावल पश्चिम सह शासकीय वाहनाने नायगाव किनगाव रस्त्यावर गस्त करीत असताना किनगावकडे जात असतांना बोलेरो पीक अप MH04 GR 4353 संदिग्ध वाहन भरधाव वेगाने जात असतांना त्याला थांबविण्याचा प्रयत्न केला मात्र वाहन चालक वाहन सोडून अंधारात फ़रार झाला. सदर वाहनाची तपासणी केली असता त्यात खैर प्रजातीचे लाकूड मिळून आले. वाहन जप्त करून शासकीय विक्री आगार यावल येथे आणून पावतिने जमा करण्यात आला आहे.     

जप्त माल महिंद्रा बोलेरो पिकअप व त्यात असलेले खैर जातीचे लाकूड अंदाजे 5.000 घन मीटर वाहन तसेच मालाची बाजार भावानुसार अंदाजित किंमत 5 लाख रुपये एवढी आहे. सदर कार्यवाहीत आर बी थोरात वनपाल गस्ती पथक, विपुल पाटील वनपाल वाघझिरा, अक्षय रोकडे वनरक्षक निंबादेवी, चेतन शेलार वनरक्षक मनूदेवी, योगिराज तेली वाहन चालक तसेच सचिन तडवी पोलिस कांस्टेबल यांनी सहभाग घेतला.सदर कार्यवाही ही हृषिकेश रंजन साहेब वनसंरक्षक धुळे, श्री. जमीर शेख उपवनसंरक्षक यावल वनविभाग जळगाव, म. आर आर सदगीर विभागीय वनाधिकारी दक्षता पथक धुळे म. प्रथमेश हडपे सहाय्यक वन संरक्षक यावल म श्री अजय बावणे वनक्षेत्रपाल गस्ती पथक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे .

वन व वन्यजीव तसेच अवैधवाहतूक लाकूड संबधित कुठाला गैरप्रकार निदर्शनास आल्यास तात्काळ टोल फ्री नंबर 1926 वर संपर्क साधण्याचे आवाहन वनक्षेत्रपाल गस्ती पथक यावल आवाहन करण्यात आले आहे.