ग्रेट मराठी न्युज (GM NEWS), रोजगार – व्यवसाय वार्ता : जामनेर तालुक्यातील मराठा कुणबी महिला व मुलींसाठी शासनमान्य मोफत कोर्स करण्याची सुवर्ण संधी.

0
40

जामनेर,दि.३ ( मिलींद लोखंडे ) : – शहरतील कौशल्य विकास प्रशिक्षण संस्था दिशा फाऊंडेशन येथे मराठा कुणबी महिला व मुलींसाठी २ व्यावसायीक कोर्स मोफत करण्याची सुवर्ण संधी उपलब्ध आहे.

        छत्रपती शाहु महाराज संस्था व मानव विकास संस्था पुणे (सारथी )योजने अंतर्गत ३ महिने कालावधीचे मोफत असणारे शिवण क्लास कोर्स आणी ब्युटी पार्लर कोर्स करण्यासाठी प्रवेश प्रक्रीया सुरु झाली आहे. दोन्ही कोर्स पैकी कोणताही एक कोर्स इच्छुकांना करता येणार असुन त्या साठी प्रशिक्षणार्थी ही १८ ते ४५ वयोगटातील किमान ८ वी पास असावी .

ज्या इच्छुकांना प्रवेश घ्यायचा असेल त्यांनी दिशा फाऊंडेशन, बाबाजी राघो मंगल कार्यालय जवळ, पाचोरा रोड जामनेर येथे संपर्क साधावा असे आवाहन संचलिका सौ.भारती संजय पाटील (मो.9850448676 ) यांनी केले आहे.