GM NEWS,FLASH: भारतीय संविधानाचा बामु विदयापीठाने केला अभ्यासक्रमात समावेश, पदवीला संविधान विषय अनिवार्य !

0
333

औरंगाबाद दि .३ ( मिलींद लोखंडे ) :- डॉ . बाबासाहेब    आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची सलग्न असलेल्या महाविद्यालयातील पदवी अभ्यासक्रमाला येत्या शैक्षणिक वर्षापासून, “भारतीय संविधान” हा विषय अनिवार्य असणार आहे. याविषयी चार ठरावाला विद्या परिषदेच्या मंगळवारी (दिनांक 31) झालेल्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे.

विद्यापीठाच्या विद्यापरिषदेची बैठक कुलगुरू डॉक्टर प्रमोद येवले यांच्या अध्यक्षतेखाली महात्मा फुले सभागृहात झाली. यावेळी कुलगुरू डॉक्टर प्रवीण वक्ते, कुलसचिव डॉक्टर साधना पांडे यांची उपस्थिती होती. या बैठकीला परिषदेचे 40 सदस्य उपस्थित होते. त्यात एकूण पन्नास प्रस्ताव मांडण्यात आले. 2 डिसेंबर रोजी झालेल्या अधिष्ठाता मंडळाच्या बैठकीत सर्व संलग्नित महाविद्यालयातील पदवी अभ्यासक्रमाला “भारतीय संविधान” हा विषय अनिवार्य करण्याचा प्रस्ताव अधिष्ठाता डॉक्टर सतीश दांडगे यांनी मांडला होता. त्यास मंजुरी दिल्यानंतर हा प्रस्ताव विद्या परिषदेच्या विचारार्थ मंगळवारी ठेवण्यात आला.