GM NEWS ,FLAS: रुपेश राजाराम बिऱ्हाडे यांना राज्यस्तरीय विश्व समता साहित्यरत्न पुरस्काराने सन्मानित .

0
128

जामनेर दि .६ ( प्रतिनिधी ) : – विश्व समता कला मंच लोवले ता.संगमेश्वर जि.रत्नागिरी या सामाजिक संस्थेचा विद्यामानाने समाजातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ३१ व्यक्तींचा गुणगौरव सोहळा पी.एस.बने इंटरनँशनल स्कूल साडवली,देवरुख ता.संगमेश्वर जि.रत्नागिरी येथे पार पडला.यामध्ये सामाजिक, शैक्षणिक, साहित्यिक, धार्मिक या क्षेत्रात महत्त्वपूर्ण कार्याबद्दल राज्यस्तरीय विश्व समता साहित्य रत्न पुरस्कार सोहळा पार पडला.उपस्थित प्रमुख पाहुणे मा.शेखरजी निकम (आमदार संगमेश्वर जि.रत्नागिरी) मा.किरण खोडके ( जेष्ठ साहित्यिक भोपाळ,) मा.राहूल सावंत (भारतीय बौद्ध महासभा मुंबई प्रदेश महासचिव ) मा.विकास पाटील (उद्योजक मुंबई) मा.युयुत्सु आर्ते (सामाजिक कार्यकर्ते, देवरुख) मा.कवी.राष्ट्रपाल सावंत,मनोज जाधव (संस्थापक अध्यक्ष विश्व.समता कला मंच देवरुख) यांच्या हस्ते जामनेर येथील रुपेश बिऱ्हाडे यांना *साहित्य रत्न पुरस्कार* देऊन गौरविण्यात आले. मानपत्र + स्मृतीचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते.या यशामुळे रुपेश बिऱ्हाडे याचे सामाजिक, शैक्षणिक, राजकीय स्तरावरुन सर्वत्र कौतुक होत आहे.