GM NEWS ,Big Breaking: पक्षांना प्राणघातक ठरणाऱ्या मांजाची विक्री व वापर करणारी व्यक्ती गुन्ह्यास पात्र .

0
176

जळगाव, दि. 8 (मिलींद लोखंडे ) : – पक्षांना प्राणघातक ठरणारा मांजा पतंग उडविण्यासाठी मोठ्या प्रमाणात वापरला जातो. या मांजावर शासनाने बंदी घातली असून त्याची विक्री करणे, साठविणे व वापरणे हा कायद्याने गुन्हा असून अशा व्यक्ती अथवा व्यापाऱ्यांविरुध्द कारवाई करण्याची मोहिम वनविभागाच्यवतीने उघण्यात आली आहे. मांजा साठवणूक करणाऱ्यांची माहिती वनविभागाला द्यावी. असे आवाहन जळगाव वनविभागाचे उपवनसंरक्षक दिंगबर पगार व यावल वन विभागाचे उपवनसंरक्षक पी. पी. मोराणकर यांनी संयुक्तपणे केले आहे.
पतंग उडविण्याचा मोसम सुरू झाला असून पतंग उडविण्यासाठी इको फ्रेंडली धागा पतंग उडविण्यासाठी पतंग शौकीनांनी वापरावा. जेणेकरून पक्षांचे प्राण वाचतील व पतंग उडविण्याच्या खेळाचा आनंद देखील घेता येईल. देशात दरवर्षी हजारो पक्षांना प्राणघातक मांजामध्ये अडकून प्राण गमवावे लागतात. तर कित्येक पक्षी कायमचे जायबंदी होतात. पक्षी हा घटक आपल्या जैवविविधतेचा अत्यंत महत्वाचा घटक असून त्यास वाचविणे, जगविणे व त्यांचे संवंर्धन करणे आपल्या जगण्यासाठी आवश्यक आहे.
पक्षीमित्रांना वनविभाग जळगाव व यावल, सामाजिक वनीकरण व वन्यजीव, औरंगाबाद तसेच पक्षीमित्र संस्था, पर्यावरण विषयक संस्था यांचेवतीने आवाहन करण्यात येते की, पक्षांना घातक ठरणारा मांजा विक्री करणे, साठविणे, वापरणे व हस्तांरण करणे कायद्याने गुन्हा आहे. तसे केल्याचे निदर्शनास आल्यास त्याची तक्रार/ माहिती पोलीस विभाग किंवा वनविभागाकडे करण्यात/कळविण्यात यावी. देशी किेवा विदेशी मांजा वापरुन पक्षांना इजा होईल असा मांजा साठविणे, वापरणे किंवा विक्री करणे हे वन्यजीव संरक्षण कायदा 1972 चे कलम 9 नुसार गुन्हा असून असा गुन्हा करणाऱ्याला कायद्याचे कलम 51 नुसार 3 वर्षापर्यंत कैद व 25 हजार एवढा दंड वा दोन्ही शिक्षेची तरतुद आहे.
तरी सर्व जिल्ह्यातील नागरिक, पतंग उडवणारे हौसी नागरिक, पक्षीमित्र यांनी पक्षांना आपल्याकडून कुठलीही इजा होणार नाही. यासाठी मांजा न वापरण्याचा संकल्प करावा व जनहितार्थ तसा प्रचार व प्रसार करावा. असे आवाहन जळगावचे उपवनसंरक्षक श्री. पगार व यावलचे उपवनसंरक्षक श्री मोराणकर यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.