GM NEWS,FLASH: राज्याचे कृषी धोरण ठरविणाऱ्या बैठकीत जामनेर येथील रवि महाजनांचा सहभाग . कृषी मंत्री ना.भुसेंनी जाणुन घेतल्या शेतकऱ्यांच्या समस्या.

0
283

मुंबई दि .18 ( मिलींद लोखंडे ) : – महाराष्ट्र राज्याचे विदयमान कृषिमंत्री ना.दादा भुसे यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील निवडक 100 शेतकरी,कृषी तज्ञ, शास्त्रज्ञ,वरिष्ठ कृषी अधिकारी ,राज्यातील शेतकरी संघटनांचे अध्यक्ष यांची संयुक्त बैठक 17-1-2020 रोजी यशवंतराव चव्हाण सभागृह, मंत्रालय मुंबई येथे आयोजित करण्यात आली होती, या बैठकीला आपल्या जळगाव जिल्ह्यातून कृषिभूषण समाधान पाटील आणि जामनेर येथील प्रगतीशील शेतकरी रवि महाजन हे आमंत्रित सदस्य म्हणुन उपस्थीत होते.
या बैठकीला केंद्रीय कृषी मूल्य आयोगाचे मा. पाशा पटेल, सदाभाऊ खोत,दै. देशोन्नतीचे मुख्य संपादक व शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी प्रयत्न करणारे मा प्रकाश पोहरे कृषी आयुक्त एकनाथ डवले साहेब आदी मान्यवर उपस्थित होते,

बैठकीच्या सुरुवातीलाच कृषिमंत्री ना.दादा भुसे यांनी ही बैठक राज्याचे कृषी धोरण ठरवण्यासाठी आयोजित करण्यात आलेली आहे त्यामुळे राजकीय विषय बाजूला ठेऊन आपण यापुढील काळात काम करायचे आहे असे सुरवातीलाच नमूद केले .

बैठकीला दुपारी 2 वाजेपासून सायंकाळी 7 वाजेपर्यंत आलेल्या शेतकर्यांच्या शेती करतांना येणाऱ्या अडचणी,समस्या कृषी योजना राबवताना येणाऱ्या अडचणी त्यातील त्रुटी ,योजनांमधील बदल ,शेतकऱ्यांच्या गरजा जाणून घेतल्या व शेतकर्यांच्या प्रगती साठी सर्व प्रयत्न केले जातील शेतकऱ्यांनी केलेल्या सूचनांचा कृषी धोरण ठरवताना निश्चित विचार केला जाईल असे उपस्थित शेतकऱ्यांना ना . भुसे यांनी यावेळी आश्वस्थ केले .बैठकीत राज्यातील शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून मते जाणून घेणारे राज्याच्या इतिहासातील पाहिले कृषीमंत्री असल्याच्या भावना उपस्थित शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या व कृषी मंत्र्यांचे आभार मानले आहेत .