ग्रेट मराठी न्युज(GM NEWS ),अभिनंदनीय वृत्त: पहूर येथील मोहिनी राऊतला राज्यस्तरीय सब -ज्युनियर तायक्वांदो स्पर्धेत कांस्य पदक

0
24

पहूर,ता.जामनेर दि.२० ( शंकर भामेरे) : –

पहूर येथिल महात्मा फुले शिक्षण संस्था संचलित सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयाची इ ५ वी विद्यार्थीनी तथा शौर्य स्पोर्ट्स अकॅडमीची खेळाडू मोहिनी हरिभाऊ राऊत हिने पूणे येथे झालेल्या ३३ व्या राज्यस्तरीय सब ज्युनिअर तायक्वांदो स्पर्धेत कांस्य पदकाची कमाई केली .

राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेत पहूर येथील सावित्रीबाई फुले माध्यमिक विदयालयाच्या ६ खेळाडूंनी सहभाग नोंदवत राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेत १ कांस्य पदक पटकविले .

वृषाली पवार , श्रावणी लोहार , कार्तिक सोनवणे , वृषभ चौधरी , भावेश महाजन यांनी उत्कृष्ठ सहभाग नोंदविला .

शौर्य स्पोर्ट्स अकॅडमीचे संस्थापक सचिव तथा सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालये क्रीडा शिक्षक हरिभाऊ राऊत,भूषण मगरे ,ईश्वर क्षिरसागर यांचे मार्गदर्शन लाभले 

महात्मा फुले शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष बाबुराव आण्णा घोंगडे , सचिव भगवान आण्णा घोंगडे , सर्व संचालक मंडळ , मुख्याध्यापिका श्रीमती वैशाली घोंगडे , जळगाव जिल्हा तायक्वांदो असोसिएशनचे सचिव अजित घारगे, श्रीकृष्ण चौधरी , राज्य पंच जयेश कासार , निकेतन खोडपे , शुभम शेटे श्रेयान ठोकरे, विद्यार्थी पालक यांनी अभिनंदन केले .