ग्रेट मराठी न्युज(GM NEWS), राजकीय वृत्त: वरणगाव शहर वंचित बहुजन आघाडीची आढावा बैठक संपन्न

0
15

भुसावळ.दि,२१.मिलींद लोखंडे 

वरणगाव येथे वंचित बहुजन आघाडीची शहर आढावा बैठक जिल्हाध्यक्ष शामिभा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व युवा जिल्हाध्यक्ष बाळा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली.यावेळी अनेक युवकांनी वंचित बहुजन आघाडी जाहीर प्रवेश केला.

आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने वंचित बहुजन आघाडी वरणगाव शहरात अधिक भक्कमपणे उभी करण्यासाठी सर्व समाज घटकातील लोकांना सोबत घेऊन नव्याने शहराची कार्यकारणी गठीत करण्याबरोबरच,शहरातील एकूण संघटनात्मक बांधणी यासह अनेक विषयांवर उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले.

याप्रसंगी जि.महासचिव ॲड.योगेश तायडे,जि.संघटक बबन कांबळे,ईश्वर लहासे,भुसावळ तालुकाध्यक्ष प्रमोद बावस्कर,ता.महासचिव गणेश इंगळे,जितेंद्र सुरवाडे,मा. वरणगाव शहराध्यक्ष संगम निकम यांच्यासह वरणगाव शहरातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.