ग्रेट मराठी न्युज(GM NEWS),अभिनंदनीय वृत्त : जामनेरचे ह.भ.प. प्रा.रामकृष्णा महाराज पाटील यांना चैतन्य रुप पुरस्कार संत सावता माळी साहित्य संमेलनात ‘तुकोपनिषद ब्रम्हज्ञान’ ग्रंथाची झाली निवड

0
15

वरुड येथे संपन्न झालेल्या साहित्य संमेलनात

जामनेर,दि.२४ (मिलींद लोखंडे ) : – अमरावती जिल्ह्यातील वरुड येथे पहिले संत सावता माळी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नुकतेच संपन्न झाले. या संमेलनात संत साहित्यातील अतिविशिष्ट सेवा कार्याबद्दल जामनेर जिल्हा जळगाव येथील संत साहित्याचे अभ्यासक आणि सुमारे 100 गुण अधिक संत साहित्य ग्रंथ लेखन करणारे संत साहित्यिक श्री.ह.भ.प. रामकृष्णा महाराज पाटील यांनी त्यांच्या सिद्धहस्त लेखणीतून लिहिलेल्या संत तुकाराम महाराज यांच्या जीवन कार्य अभंगावर आधारित “तुकोपनिषद ब्रह्मज्ञान” या वैचारिक ग्रंथाला चैतन्य रूप पुरस्कार बहाल करण्यात आला. या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. मधुसूदन घाणेकर यांच्या हस्ते आणि अमरावती येथील महात्मा फुले बँकेचे अध्यक्ष श्री. दिलीप लोखंडे, पी आर पब्लिकेशन्स ग्रुपचे संचालक आणि संमेलन संयोजक श्री.ह.भ.प.डॉक्टर शंतनु रसे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदान करण्यात आला.सन्मानपत्र ,ट्रॉफी, शाल नामांकित कवी आणि लेखकांचे ग्रंथ असे या चैतन्य रूप पुरस्काराचे स्वरूप आहे.

     प्राध्यापक रामकृष्णा महाराज पाटील यांनी आतापर्यंत सुमारे शंभरहून अधिक संत साहित्यिक ग्रंथांचे लेखन केले असून यात संत तुकाराम महाराज, संत मुक्ताबाई, संत नामदेव महाराज ,संत शंकर महाराज, संत अवली बाबा, संत सेना महाराज यांच्यासह महाराष्ट्रातील सर्वच संतांचे अभंग चरित्र रूपाने लेखन केले असून त्यांचे शंभरहून अधिक धार्मिक अध्यात्मिक ग्रंथ लिहून प्रसिद्ध होत आहेत.

     या पहिल्या सावता माळी काव्य संमेलनाच्या वेळी प्रमुख अतिथी म्हणून महात्मा फुले बँक अमरावतीचे अध्यक्ष श्री. दिलीपभाऊ लोखंडे, सोलापूर येथील अहिल्यादेवी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ.शिवाजी शिंदे, वरुड पंचायत समितीचे माजी सभापती विक्रम ठाकरे ,सामाजिक कार्यकर्ते महेंद्र राऊत ,श्री. उमेश यावलकर, निळकंठराव यावलकर, अरुण घोडेराव, साहित्यिक जयकुमार चर्जन ह.भ.प.सौ. शीलाताई चिवटकर ,नाशिक येथील प्रबोधनकार भारत भूषण डॉ. चिदानंद फाळके, कवी आणि वरिष्ठ पत्रकार नितीन गायके ,कवी आणि वरिष्ठ पत्रकार प्रा.नागेशराव हुलवळे ,कवी सरकार इंगळी कोल्हापूर यांची विशेष उपस्थिती होती.

    यावेळी उपस्थित मान्यवरांनी रामकृष्ण महाराज पाटील यांच्या साहित्यिक सेवेचा मुक्तकंठाने गौरव केला.वरुड जिल्हा अमरावती येथे संपन्न झालेल्या पहिल्या संत सावता माळी साहित्य संमेलनाच्या यशस्वीतेसाठी श्रीमती उज्ज्वला रसे, कवी वैभव वाघ ,डॉ. विजय शिंदे, कवयित्री समीक्षा चव्हाण यांनी विशेष परिश्रम घेतले.