ग्रेट मराठी न्युज(GM NEWS),दिन विशेष वृत्त: शेंदुर्णी येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा नगरपंचायत कार्यालयात आरोग्य कर्मचाऱ्यांचा प्रशस्तीपत्र देऊन सन्मान व वृक्ष लागवड कार्यक्रम

0
13

शेंदुर्णी,ता.जामनेर,दि.२६(योगेश सोनार):-

भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या ७५ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त सकाळी आठ वाजता शेंदुर्णी नगरपंचायत कार्यालयात मुख्याधिकारी तथा प्रशासक मा. साजिद पिंजारी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.यावेळी शहरातील माजी नगराध्यक्षा सौ.विजयाताई खलसे, माजी उपनगराध्यक्ष श्री गणेश पाटील, माजी नगरसेवक नगरसेविका ज्येष्ठ नेते श्री गोविंदजी अग्रवाल, श्री अमृतजी खलसे, श्री संजय दादा गरुड सौ.सरोजिनी ताई गरुड ,श्री सागर शेठ जैन,श्री नारायण गुजर,श्री शांताराम गुजर,श्री राजेंद्र भारुडे,श्री राजू खखारे,नप कर्मचारी,पत्रकार बंधू व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी शेंदुर्णी नगरपंचायत हद्दीतील स्वच्छतेसाठी,ओला व सुका कचरा विलगीकरण,शौचालये स्वच्छ करणे कामी उत्कृष्ठ काम करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. 

             यानंतर शेंदुर्णी येथील घकनकचरा प्रकल्प येथे मोठया प्रमाणात वृक्षारोपण करण्यात आले. कार्यक्रम प्रसंगी मुख्याधिकारी तथा प्रशासक मा. साजिद पिंजारी म्हणाले,माझी वसुंधरा अभियान २.० अंतर्गत शेंदुर्णी शहराचा राज्यात द्वितीय क्रमांक प्राप्त झाल्यानंतर शासनामार्फत २ कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर झाले होते.त्या निधीतून शहरात जवळपास ९००० च्या वर वृक्षे लावण्यात येणार असुन वृक्षांना चोवीस तास पाण्याची व्यवस्था करून ३ वर्षाकरीता योग्य ती देखभाल घेतली जाणार आहे.तसेच केंद्रीय गृहनिर्माण तथा शहरी कार्य मंत्रालय, भारत सरकार व महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री महोदय यांच्या निर्देशानुसार शहरात “स्वच्छ तीर्थ” मोहीम राबविण्याचे निर्देशानुसार प्रतिष्ठित व्यक्ती,नागरिक आणि शेंदुर्णी नप च्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सक्रिय सहभागाने शहरात मोठ्या प्रमाणात डीप क्लिनिंग ड्राइव्ह महास्वच्छता अभियान प्रभावीपणे राबविल्याने मुख्याधिकारी तथा प्रशासक मा. साजिद पिंजारी यांनी आभार मानले.तसेच माझी वसुंधरा अभियानाअंतर्गत शहरातील ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्यात येत असून, यामुळे नागरिकांना भविष्यात पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी याची खूप मदत होणार आहे. त्याच बरोबर शहर हरित होत असून,यामुळे शेंदुर्णी शहराच्या वैभवात भर पडणार आहे असे प्रतिपादन त्यांनी केले.