ग्रेट मराठी न्युज(GM NEWS), अभिनंदीनय वृत्त: बहुप्रतिक्षीत फत्तेपूर पोलीस स्टेशनला अखेर मंजूरी ! स.पो.निरीक्षक गणेश फड यांची प्रभारी अधिकारी तर पो. उपनिरीक्षक संजय बनसोड यांची दुय्यम अधिकारी म्हणून नियुक्त

0
24

फत्तेपूर,ता.जामनेर,दि.४(सलीम पटेल): –
फत्तेपुर परीसरा साठी स्वतंत्र पोलीस स्टेशन असावे ही मागणी गेल्या अनेक वर्षांपासून नागरिकांनी केलेली होती. अखेर स्वतंत्र फत्तेपूर पोलीस स्टेशनचा होण्याचा मार्ग मोकळा झाला असून भुसावळ बाजारपेठ चे स.पो. निरीक्षक गणेश पांडूरंग फड यांची फत्तेपूर येथील नवनिर्मित पोलीस स्टेशनच्या प्रभारी अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे.तसेच पहूर पोलीस स्टेशनचे पो.उपनिरीक्षक संजय बनसोड यांची दुय्यमअधिकारी पदावर नियुक्ती झाली आहे.
विदर्भ मराठवाडा आणि खांदेशच्या सिमेवर अजिंठा पर्वत रांगेत हा संपूर्ण परिसर वेढलेला आहे तिन्ही विभागातील जवळपासच्या चाळीस गावांचा दैनंदिन संपर्क फत्तेपूरला येतो जामनेर तालुक्यातील सर्वात मोठी ग्राम पंचायत मोठी बाजारपेठ वाढती रहदारी या सर्व बाबींचा विचार करून महाराष्ट्र राज्याचे माजी गृहराज्यमंत्री स्व. जे.टी. महाजन यांच्या कार्यकाळापासून पोलीस स्टेशनच्या मागणीचा पाठपुरावा सुरु होता परंतु त्याला चालना मिळत नसल्याने हे काम थंडबस्त्यात पडले होते मात्र ना.गिरीश महाजन यांची महाराष्ट्राच्या मंत्री मंडळात वर्णी लागताच या मागणीला चालना मिळाली त्या नुसार भव्य आणि सुसज्य इमारत उभी राहिली दरम्यान जिल्ह्याची लोकसंख्या व भौगोलिक परिस्थिती दाखल गुन्ह्याची संख्या यामुळे पोलिसांवर ताण येत असे फत्तेपूरला पोलीस स्टेशन झाल्यामुळे हा ताण कमी होईल या सर्व बाबींचा विचार करून पोलीस महासंचालक कार्यालयामार्फत पोलीस स्टेशनचे प्रस्ताव मागविण्यात आले होते ते गृह विभागाकडे सादर करून त्यास अंतिम मान्यता देण्यात आली.