ग्रेट मराठी न्युज (GM NEWS), अभिनंदनीय वृत्त : केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धेत टाकरखेडा शाळेचे सुयश

0
16

जामनेर,दि.६ (प्रतिनिधी ): – जामनेर तालुक्यातील शहापूर केंद्रस्तरावर गटशिक्षणाधिकारी आर. ए. लोहार, शापोआ अधिक्षक व्ही. व्ही. काळे, उपशिक्षणाधिकारी विजय सरोदे, केंद्रप्रमुख विकास वराडे यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक ५/२/२०२४ रोजी झालेल्या क्रीडा स्पर्धेत टाकरखेडा येथील जि.प शाळेने घवघवीत यश संपादन केले आहे.

  🔹३री व ४ थी च्या गटात कबड्डी स्पर्धेत मुलांच्या गटात प्रथम क्रमांक तसेच मुलींच्या गटात कबड्डी स्पर्धेत प्रथम क्रमांक

🔸इयत्ता ३ री व ४ थी च्या गटात लंगडी स्पर्धेत मुलांच्या गटात प्रथम क्रमांक 

तसेच मुलींच्या लंगडी स्पर्धेत प्रथम क्रमांक 

🔹इयत्ता ६वी व ७ वीच्या गटात मुलांन मधून खो-खो स्पर्धेत प्रथम क्रमांक

🔸१०० मीटर धावणे मुलांच्या गटात

गणेश विकास भोई ४ थी (प्रथम क्रमांक)

🔹२०० मीटर धावण्याच्या शर्यतीत मुलांच्या गटात गितेश नारायण आगळे इ. ७ वी (द्वितीय क्रमांक)

 विजयी स्पर्धक तसेच विजयी संघ यांना ट्रॉफी व मेडल देवून शहापूर केंद्राचे केंद्रप्रमुख विकास वराडे तसेच उपस्थितांच्या हस्ते गौरविण्यात आले. विजयी स्पर्धककांचे व विजयी संघाचे टाकरखेडा शाळेच्या वतीने ग्रेडेड मुख्याध्यापक पी.टी.पाटील तसेच शाळेतील सर्व शिक्षक यांनी अभिनंदन केले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी ग्रेडेड मुख्याध्यापक पी.टी.पाटील उपशिक्षक जयंत शेळके, नाना धनगर, श्रीमती छाया पारधे, श्रीमती निर्मला महाजन यांनी परिश्रम घेतले.