GM NEWS,FLASH: जामनेर तालुका आरोग्य विभागाच्या वतीने आशा दिन उत्साहात साजरा .

0
410

जामनेर दि.२ ( मिलींद लोखंडे ) : –                      सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन व जि. प.जळगांव यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. डी. एस. पोटोडे यांच्या मार्गदर्शनाखाली आशा स्वयंसेविका यांच्या कामाचे कौतुक व्हावे व तळागाळात काम करणाऱ्या आशा स्वयंसेविका यांच्या कामाची दखल घेतली जावी या उद्देशाने आशा दिनाचे आयोजन जामनेर आरोग्य विभागाच्या वतीने पं.स. सभागृहामधे करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे उदघाटन दीपप्रज्वलनाने व राजमाता जिजाऊ पूजनाने करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समिती सभापती सुनंदा पाटील ह्या होत्या. प्रमुख पाहुणे म्हणुन उपसभापती एकनाथ लोखंडे व जि. प.सदस्य अमित देशमुख हे होते. माजी सभापती नीता पाटील, पं. स.सदस्य रमण चौधरी, प्रल्हाद पाटील,नवलसिंग पाटील,पं. स.गटविकास अधिकारी आय.सी.गोयल,
डॉ.मनोज तेली,डॉ.प्रशांत पाटील,डॉ.योगेश राजपुत यांची विशेष उपस्थिती होती.
तालुका आरोग्य अधिकारी डॉ. राजेश सोनवणे यांनी सूत्रसंचालन केले डॉ.नरेश पाटील यांनी प्रास्ताविक केले तर डॉ.पल्लवी सोनवणे यांनी मान्यवरांचे तसेच आशा व गटप्रवर्तक यांचे आभार मानले.
एकूण रेखा ठोसर, ज्योती पवार, छाया सोनवणे, गीता पाटील,सिमा राजपुत, सुनिता कणेकर, सुनीता राठोड, ज्योती पाटील,मोनाली चव्हाण, नसीम बानो सय्यद, शीतल चौधरी, सोनुबाई तेली, वंदना सुरवाडे, मंगला चव्हाण आशा एकूण14 आशा व 11 गटप्रवर्तक यांना प्रशस्तीपत्र, स्मृतिचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.जि. प.स्थायी समितीमध्ये निवळ झाल्याबद्दल जि. प.सदस्य अमित देशमुख यांचा पंचायत समिती जामनेर व आरोग्य विभागाकडून सत्कार करण्यात आला.
शिवाली देशमुख,अनुराधा कल्याणकर ,प्रदीप पाटील,सुशीला चौधरी, भागवत वानखेडे यांचा त्यांच्या आशास्वयंसेविका यांच्याशी संबंधित कार्या बद्दल सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमास रवींद्र सूर्यवंशी,घृष्णेश्वर पाटील,अनंता अवचार, सुनील पाटील,गोपाळ पाटील,विजय पवार, सुधाकर माळी, सतिष पाटील यांचे अनमोल सहकार्य  लाभले