GM NEWS,FLASH: जामनेर तालुक्यातील चिंचखेडा गावचा नितिन पाटील ठरला मिस्टर झुंजार महाराष्ट्र फॅशन शो चा प्रथम क्रमांकाचा विजेता .

0
1044

जामनेर दि.५ ( मिलींद लोखंडे ) : – आई सेवा प्रतिष्ठान व सुरज क्रिएशन आयोजीत मिस्टर झुंझार महाराष्ट्र हा राज्यस्तरीय मानाचा फॅशन शो नाशिक येथे प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी मोठ्या उत्साहात पार पडला .
या फॅशन शो स्पेर्धेमधे राज्यभरातील मॉडेल्सनी हजेरी लावली होती . अखेर आपल्या भारदस्त व्यक्तीमत्वामुळे आणि रॅम्प वॉक मुळे जामनेर तालुक्यातील छोटयाशा चिंचखेडा या खेडे गावातील नितीन पाटील याने या मिस्टर झुंझार महाराष्ट्र फॅशन शो मधे प्रथम क्रमांक पटकवला आहे . त्याने यापुर्वी सुध्दा पुण्यातील फॅशन शो मधे प्रथम क्रमांक प्राप्त केला होता .यासोबतच नितीन पाटील याने प्रेमाचा डंका गाजु लागला या मराठी अल्बम मधे सुध्दा अभिनय केला आहे .
नितीन पाटील याला या मिस्टर झुंजार महाराष्ट्र फॅशन शो चे प्रथम क्रमांकाचे स्मृतीचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले आहे. ग्रामीण भागातील युवकांनी सुध्दा ध्येय निश्चित करून कठोर मेहनत केल्यास कोणत्याही स्पर्धैत ते मागे राहत नाहीत हे जामनेर तालुक्यातील नितीन पाटील या युवकाच्या विजया मुळे दिसुन आले आहे . नितीन पाटील याने प्राप्त केलेल्या विजयाबद्दल चिंचखेडा ग्रामस्थांसह मित्र परिवाराने त्याचे अभिनंदन केले आहे .