GM NEWS,FLASH: जामनेर लोक न्यायालयात २८९ प्रकरणे तडजोडीने निकाली . शासनाच्या विविध विभांगांच्या ३९,४४,०५०रुपयांची तडजोडीने वसुली.

0
160

जामनेर,दि .८मिलींद लोखंडे ) : – तालुका विधी सेवा समिती जामनेर तथा दिवाणी व फौजदारी न्यायालय जामनेर यांच्या वतीने राष्ट्रीय लोक न्यायालयाचे आयोजन आज करण्यात आले होते. सदर लोकन्यायालात एकूण १८ न्यायालयीन प्रकरणे निकाली काढण्यात आली. तसेच ग्राम पंचायतीचे २६७ प्रकरणे,तर बी एस एन एल विभागाची ०१,तर महावितरणची०४प्रकरणे, बँकेची ०४प्रकरणे अशी एकूण २७६वादपूर्व प्रकरणे लोक न्यायालयातून आज निकाली निघाली.
एकूण २८९प्रकरण तडजोडीने निकाली काढण्यात आली.लोक न्यायालयातून एकूण ३९,४४,०५०रू.ची तडजोड रक्कम वसुली करण्यात आली.
सदर लोकन्यायालयात तालुका विधी सेवा समिती अध्यक्ष तथा दिवाणी न्यायाधीश श्री.एम.एम.चितळे साहेब यांनी तर विधीज्ञ एस बी साळवे मॅडम यांनी कामकाज पाहिले.
सदर लोक न्यायालयास सह दिवाणी न्यायधीश श्री. एस सी हावेलीकर साहेब,दुसरे सह दिवाणी न्यायधीश श्री ए ए कुलकर्णी साहेब देखील लोक न्यायालयास येथे हजर होते. सरकारी अभियोक्ता अॅड. अनिल सारस्वत यांच्यासह वकील संघातील विधीज्ञ एस.एम. सोनार, पी .के .सोनार,डोल्हारे साहेब, एस .एन. साठे, आर.पी. पाटील,पी.जी. शुक्ल, एन.टी. चौधरी, डी.एम.चौधरी, के.एच.चौधरी, व्ही.ए. चौधरी,डी.व्ही.राजपुत,डी.पी. बोरसे,डी.बी. बोरसे आदी मान्यवर हजर होते.