GM NEWSF,LASH: भुसावळच्या औष्णिक विद्युत केंद्रासाठी सी.एस.आर.निधी अंतर्गत ३ कोटी ७२ लाखाचे विकास कामे मंजूर . खासदार रक्षाताई खडसे यांच्या प्रयत्नांना यश .

0
67

भुसावळ दि .११ ( मिलींद लोखंडे ) : – खासदार रक्षाताई खडसे यांच्या प्रयत्नांनी औष्णिक विद्युत केंद्र दीपनगर भुसावळ अंतर्गत बाधित असलेल्या गावांना औष्णिक विद्युत केंद्र दीपनगर भुसावळ यांच्या सी.एस.आर. निधी अंतर्गत ३ कोटी ७२ लाख ४० हजार दोनशे पाच इतक्या रुपयांच्या विकास कामांना औष्णिक विद्युत केंद्र दीपनगर भुसावळ यांच्या मंडळाने मंजुरी दिली आहे .

औष्णिक विद्युत केंद्र दीपनगर भुसावळ अंतर्गत बाधित असलेल्या गावांकडून सी.एस.आर. निधीची मागणी करण्यात येत होती. खासदार रक्षाताई खडसे व आमदार संजयभाऊ सावकारे यांचा माजी उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे व औष्णिक विद्युत केंद्र दीपनगर भुसावळ यांचे कडे वारंवार विकासकामांसाठी निधी बाबत पाठपुरावा चालू होता. त्यानुसार दुसखेडा, फेकरी, गहुखेडा, जाडगांव, कपिलनगर, कासवा, कठोरा बु., कठोरा खु., मण्यारखेडा, निंभोरा बु. फुलगांव, रायपूर, रणगांव, साकरी, सूदगांव, वेल्हाळे, पिंप्रीसेकम अशा एकूण सतरा गावांना गावांतर्गत रस्ते व गटार कॉंक्रीटीकरण करणे साठी निधी मंजूर करण्यात आला आहे. अशी माहिती रक्षाताई खडसे यांचे संपर्क कार्यालया मार्फत देण्यात आली.