GM NEWS, दु:खद घटना : लग्नाच्या बोहल्यावर चढण्याआधी नवरदेवाचा मृत्यू.कुरंगी गावावर शोककळा.

0
627

*पाचोरा दि .११ (प्रतिनिधि) – लग्नाची तारीख जवळ येते आहे म्हणून घरात लग्णाची एकीकडे लगभग सुरु असतांना दुसरीकडे गिरणा नदीच्या वाहत्या पाण्यात पडुन नवरदेवाचा मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील कुरंगी गावात घडली*.

*तालुक्यातील कुरंगी गावातील शेतमजूरी करणारा रमेश झगा पाटील वय २७ हा आज दि. ११ फेब्रुवारी रोजी ४.४५ वाजेच्या सुमारास गिरणा नदीवर दोघा बहीणीं घरातील झावरी धुण्यासाठी आल्या असता त्यांच्या बरोबर आला असता अचानक पाय सरकल्याने नदीच्या वाहत्या पाण्यात गेल्याने मृत्यू झाला*.

*मयत रमेश याचा दि. १८ फेब्रुवारी रोजी विवाह पदमालय देवस्थान येथे नियोजित होता त्याची नववधू पुणे येथील होती अचानक रमेश च्या मृत्यू ची बातमी घरच्यांना आणि परीसरात मिळताच शोककळा पसरली. त्याचा मृतदेह पाचोरा येथे ग्रामीण रुग्णालय आणण्यात आला असून उद्या शवविच्छेदन होणार आहे. मयतास आई दोन बहिणी सह दोन भाउ आहेत. अंत्यत प्रतिकुल परीस्थितीत त्यांचे कुटुंब उदरनिर्वाह करीत आहे त्यामुळे घरातील कर्ता पुरुष गेल्यामुळे शासनाने त्वरित नैसर्गिक आपत्तीतुन मदत करावी अशी मागणी कॉग्रेस चे सचिन सोमवंशी यांनी तहसीलदार यांच्या कडे केली आहे*.

*मयत रमेश पाटील याचा उद्या दि. १२ रोजी सकाळी १० वाजता अंत्ययात्रा कुरंगी गांवातुन निघणार आहे*.