GM NEWS,FLASH: शेंदुर्णी येथे संत शिरोमणी श्री नरहरी महाराज पुण्यतिथी सोहळा मोठ्या भक्तिभावात संपन्न . समाज उपयोगी नियोजीत कार्यालयाच्या फलकाचे अनावरण .

0
147

शेंदुर्णी.दि,१२ ( योगेश सोनार ) : -शेंदुर्णी ता.जामनेर येथील सुवर्णकार प्रतिष्ठान व महिला सुवर्णकार प्रतिष्ठान
यांच्या संयुक्त विद्यमाने श्री संत शिरोमणी नरहरी सोनार महाराज यांची ७३४ वी पुण्यतिथी सोहळा येथील संत श्री नरहरी महाराज नगर येथे उत्साहात संपन्न झाला . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपाचे जेष्ठ नेते गोविंद अग्रवाल होते . .
कार्यक्रमाच्या सुरुवातीला संत नरहरी महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन व दिपप्रज्वलन व नियोजीत बहुउद्देशीय हॉलच्या फलकाचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले .
सकाळी कडोजी महाराज मंदिरात संत नरहरी महाराज यांच्या मुर्तिस अभिषेक व पुजाअर्चा करण्यात आली . तसेच दिनेश विसपुते यांच्या घरी सत्यनारायणाची पुजा करण्यात आली . दुपारी ४ वाजेपासून संध्याकाळी ७ वाजेपर्यंत शहरातील मुख्य मार्गाने भव्य पालखी सोहळा संपन्न झाला. पालखी सोहळ्यात पंचक्रोशीतील पुरुष , महिला भजनी मंडळ , समाज बंधू भगिनी
, लहान मुले ,यांचा मोठया प्रमाणात सहभाग होता . रात्री ८ वा हभप रविंद्र महाराज (तारखेडकर ) यांचा सुश्राव्य किर्तनाचा कार्यक्रम श्री त्रिविकममंदिरात संपन्न झाला .
प्रमुख पाहूणे म्हणून शेंदुर्णी नगरीच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा विजया खलसे , अमृत खलसे , माजी जि.प. सदस्य संजय गरूड , मनसे जिल्हा उपाध्यक्ष डॉ . विजयानंद कुलकर्णी ,नगरपंचायतीच्या गटनेत्या रंजना धुमाळ , सर्व नगरसेवक,यांची उपस्थिती होती
कार्यक्रम प्रसंगी मंगल कार्यालयाच्या नियोजीत जागेच्या फलकाचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले .आणी भविष्यात या जागी बहुउद्देदेशिय हॉल बांधून तेथे सामाजिक विकासाच्या दृष्टीने विविध कार्यक्रम घेण्याचा संकल्प समाज बांधवातर्फे करण्यात आला .
कार्यक्रमाचे प्रास्ताविक समाज अध्यक्ष श्रीपाद विसपुते यांनी केले .तर सुत्रसंचलन संजय विसपुते तर आभार योगेश वडनेरे यांनी मानले .
कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व समाज बांधवांनी अथक परिश्रम घेतले .