GM NEWS, गोड बातमी : ज्योत्स्ना विसपुतेंच्या भूमीहीन महीला शेतमजुर सक्षमीकरण योजनेच्या प्रस्तावाची अंमलबजावणी कडे वाटचाल. मुख्यमंत्री उध्दव ठाकरें यांची सकारात्मक ठाम निश्चयाची भुमीका.

0
905

जळगांव दि.१६ ( मिलींद लोखंडे ) : – महाविकास आघाडी सरकारने राज्यातील शेतकरी बांधवांसाठी महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेचा जो स्तुत्य निर्णय घेतला आहे त्या नुसारच भुमीहीन शेतमजुर माहिलांसाठी सुद्धा सक्षमीकरण योजना राबविण्यात यावी अशी मागणी राज्य महिला आयोगाच्या मा . सदस्या तथा शेतकरी सुकाणु समीतीच्या राज्य सदस्या काँग्रेस नेत्या ज्योत्स्ना विसपुते यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मंत्रालयात जाऊन केली होती . या योजनेच्या अंमल बजावणीसाठी त्यांनी स्वःताच अभ्यासुर्ण प्रस्ताव तयार करून मंत्रालयात दाखल केला होता . मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे काल जळगांव दौऱ्यावर आलेले असतांना ज्योत्स्ना विसपुते यांनी जैन हील्स येथे त्यांची भेट घेऊन या योजने बाबत पुन्हा चर्चा केली . मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भुमीहीन महिला सक्षमीकरण योजनेच्या प्रस्तावाला सकारात्मक प्रातिसाद दिला असुन ही योजना निर्णया कडे वाटचाल करत असल्याचे ज्योत्स्ना विसपुते यांना जळगांव भेटीत सांगीतले आहे .
ज्योत्स्ना विसपुते यांनी भुमीहीन महिला शेतमजुर सक्षमीकरण योजनेचा हा अभ्यासुर्ण प्रस्ताव तयार केला असुन या योजनेसाठी आवश्यक असणारे निकष , शेतमजुर महिलांना मासीक मानधन, संगणीकृत ओळखपत्र, प्रशिक्षण, उदयोग अर्थसहाय्य यासह इतर महत्त्वपुर्ण माहितीसह हा प्रस्ताव त्यांनी तयार केला आहे . मुख्यमंत्री उद्वव ठाकरे यांनी ज्योत्स्ना विसपुतेंच्या या महत्वपुर्ण योजनेच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिल्यामुळे राज्यातील भुमीहीन शेतमजुर महिला सुध्दा आता सक्षम होणार आहेत .