GM NEWS,FLASH: तळेगाव येथील खान्देश सिंगर अशोक कोळी यांच्या ‘मामा तुनी पोर माले दे ना’… या अहिराणी गिताने महाराष्ट्रला लावले वेड .

0
537

तळेगाव ता. जामनेर ता. ३ ( डॉ. गजानन जाधव ) : –
मामा तुनी पोर माले दे ना… या अहिराणी गिताने गाजत असलेले तळेगाव खानदेश चे सिंगर अशोक कोळी यांनी महाराष्ट्रला वेड लावले
मला बालपणापासूनच गायनाची आवड आहे शालेय जीवनात सांस्कृतिक कार्यक्रम, वक्तृत्व स्पर्धा, कविता गायन, यांची आवड होती आणि इयत्ता चौथी पासून वयाच्या १०व्या वर्षी भजन गायन क्षेत्रात गीतकार लेखक रमेश कोळी व श्रावण सोनू कोळी हे माझे गुरु यांनी ‘ माय पिताचा पाईक होऊनी या पहिल्या गिताने
सुरुवात केली आणि तद्नंतर हुंडाबळी, दारूबंदी, स्त्रीभ्रूणहत्या, ग्रामस्वच्छता अभियान, बेटी पढाव बेटी बचाव, शालेय शिक्षण विभाग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यावर लेखक व गीतकार श्रावण सोनु कोळी यांनी स्वरचित गीताला सिंगर अशोक कोळी यांनी संगीत गायन करून लोकांना मंत्रमुग्ध केले व यूट्यूब च्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचविली त्यामुळे माझा पहिला कार्यक्रम २८ ऑगस्ट २०१२ मध्ये आकाशवाणी केंद्र जळगाव येथे लेखक व गीतकार श्रावण सोन कोळी यांचे स्वरचित स्त्रीभ्रूणहत्या हुंडाबळी दारूबंदी ही गीते सिंगर अशोक कोळी यांनी संगीत व गायन करून प्रसारित झाला आणि यूट्यूब च्या माध्यमातून गीतकार के.के.कोळी दहिगाव यावल यांच्यामार्फत महाराष्ट्रात गाजत असलेले डिजे सोनु मोनु इगतपुरी (मुंबई) स्टेरिओ मध्ये रंगला कोळी वाडा या मराठी सॉंग या गीताने खानदेशात नव्हे तर महाराष्ट्रात नावलौकिक झाले त्यानंतर लेखक रत्नाकर कोळी जळगाव यांचे अहिराणी मराठी हिंदी गीते मराठी सॉंग
त्यात मामा तुनी पोर माले दे ना…., गुलाम होयनु तूना प्यार मा…., तुझ्या एका इशाऱ्याने…., हे गीते गाजत आहे तर लेखक घनश्याम कोळी खामखेड ता. चोपडा यांचे राणी तुनी ओढणी हे गीत रोहिणी स्टुडिओ शेंदवा येथे रेकॉर्ड केले. तर आता लवकरच दारुबंदीवर सिंगर अशोक कोळी हे गीत सादर करणार आहे अशाप्रकारे मी एक छोटासा खेडेगावातील छोटासा सिंगर खानदेशी सिंगर असून माझ्या जीवनाला कलाटणी मिळाली आहे मी जिल्हा परिषद माजी अध्यक्षा सौ प्रयाग ताई संतोष कोळी यांचा लहान देवर आहे माझा व्यवसाय ऑटोरिक्षा चालविणे असून सिंगर बनण्याचे माझे लहानपणाचे स्वप्न पूर्णत्वास जात आहे.