GM NEWS,FLASH: महिला दिनाच्या निमित्त ‘ती आणि तिचे चार दिवस’ गिर्यारोहक वैभव ऐवळेंनी राबविला स्तुत्य उपक्रम .

0
316

मुंबई दि. ८ ( मिलींद लोखंडे ) : – महिलांनी स्वतःच्या हक्कासाठी दिलेल्या लढ्याच्या स्मरणार्थ दरवर्षी, *८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन* म्हणून साजरा करण्यात येतो.

भारतात मुंबई येथे *पहिला ८ मार्च हा महिला दिवस १९४३* साली साजरा झाला. पुढे १९७५ हे वर्ष युनोने *`जागतिक महिला वर्ष’* म्हणून जाहीर केले. त्यानंतर स्त्रियांच्या समस्या ठळकपणे समाजासमोर येत गेल्या. स्त्रियांच्या संघटनांना बळकटी आली. बदलत्या सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक परिस्थितीनुसार काही प्रश्नांचे स्वरूप बदलत गेले तशा स्त्री संघटनांच्या मागण्याही बदलत गेल्या. आता बँका, कार्यालयांमधूनही ८ मार्च साजरा व्हायला लागला आहे. आजच्या काळात जागतिक महिला दिन सर्वत्र साजरा करताना दिसून येतो.

८ मार्च हा आंतरराष्ट्रीय स्तरावर महिलांचे अधिकार आणि जागतिक शांतता या हेतूने साजरा केला जातो. महाराष्ट्रातील काही गिर्यारोहकांनी *ती आणि तिचे चार दिवस* हा मासिक पाळी व त्या दिवसात येणाऱ्या समस्या आणि त्यासाठी घ्यायची काळजी हा उपक्रम गेले ६ महिने राबवित आहेत. आज रविवार दि. ८ मार्च, २०२० रोजी महिला दिनाचे औचित्य साधत खासकरून महिलांसाठी एक सामाजिक मोहीम आयोजित करण्यात आली. ह्या मोहिमेत पनवेल जवळील प्रबलमाची ह्या आदिवासी पाड्यात मासिकपाळी वरील मार्गदर्शन पुस्तिका आणि sanitari pad चे मोफत वाटप करण्यात आले.
*आजकालच्या धावपळीच्या जीवनात स्त्रियांनीच पुढाकार घेऊन अश्या मोहिमा यशस्वी करायच्या आहेत. तसेच, स्त्रियांनी आपल्या सोबत समाजाचा विकास होईल ह्या साठी कार्यशील राहावे असा ह्या मोहिमेचा हेतु आहे असे सहभागी गिर्यारोहकांनी सांगितले.*

आपण जाणून घेऊया कोण आहेत हे गिर्यारोहक जे आपल्या रोजच्या धावपळीच्या जगण्यातून आपला छंद जपण्यासोबताच सामाजिक बांधिलकी म्हणुन, दऱ्याखोऱ्यात आदिवासी पाड्यात जिकडे फक्त वारा, उन, पाऊस ह्यांनी सोडून कोणीही जात नाहीत. तिकडेच आपल्या रोजच्या दिनचर्येतून वेळ कडून फक्त जात नाहीत तर तिकडे सामाजिक उपक्रम राबवतात.
आज आपण अश्या अवलिया विषयी जाणून घेऊया,
मूळ गाव वाढेगाव (सांगोला, सोलापूर) सध्या वास्तव्य मुंबई मध्ये ह्यांनी आजवर आदिवासी पा जाऊन, मतदान जनजागृती, बालदिन सोहळा, महाराष्ट्र दीन आणि *ती आणि तिचे चार दिवस* अशी मासिक पाळी होणारे त्रास आणि त्या दिवसात घ्यावयाची काळजी अशी मोहीम आज पर्यंत ६ वेळा यशस्वीपणे पूर्ण केली आहे.
हे झाले त्याचे सामाजिक कार्य. ह्या व्यतिरिक्त गिर्यारोहक वैभव पांडुरंग ऐवळे, यांनी जगातील सात खंडापैकी दोन खंडातील दोन सर्वोच्च शिखरे सर करून भारताचा स्वतंत्रता दिवस आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा करण्याचा विश्र्व विक्रम केला आहे.

वैभवने दि. १५, ऑगस्ट २०१९ रोजी भारताच्या ७३ व्या स्वतंत्रता दिनानिमित्त यूरोप खंडातील सर्वोच्च शिखर माउंट एल्ब्रुस सर करून ७३ भारतीय ध्वजांचे ध्वज-तोरण फडकावून विश्व-विक्रम केला. याचीच नोंद आशिया बुक ऑफ रेकॉर्ड, इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड, हाई-रेंज बुक ऑफ रेकॉर्ड आणि इनक्रेडीबल बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये झाली आहे.

वैभव यांना इनक्रेडीबल बुक ऑफ रेकॉर्ड चे पदक आणि प्रमाणपत्र जगप्रसिद्ध समाजसेवक पद्मश्री प्रकाश आमटे आणि सौ. मंदाकिनी आमटे ह्याच्या हस्ते हेमलकसा येथे आयोजित कार्यक्रमात देण्यात आला.

तसेच, हाय रेंज बुक ऑफ रेकॉर्ड चे पदक आणि प्रमाणपत्र मा. श्री. राजसाहेब ठाकरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला होता.

तसेच, वैभवने दि. १५, ऑगस्ट २०१८ रोजी भारताच्या ७२ व्या स्वतंत्रता दिनानिमित्त आफ्रिका खंडातील सर्वोच्च शिखर माउंट किलीमांजारो सर करून ७२ भारतीय ध्वजांचे ध्वज-तोरण फडकावून विश्व-विक्रम केला. याची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड आणि हाई-रेंज बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये झाली आहे.

“MOST NUMBER OF INDIAN NATIONAL FLAG HOISTED ON THE TOP OF MOUNT ELBRUS AND MOUNT KILIMANJARO” असा रेकॉर्ड त्यांच्या नावे नोंदविला आहे.

वैभव ह्याने आपली आवड जपताना योग्य असे शिक्षण ही घेतले आहे. वैभव ह्यांनी रसायनशास्त्र विषयात पदवी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे.

वैभव सोबत त्यांचे मित्र गिर्यारोहक निलेश माने, ह्यांनी देखील दि. १५, ऑगस्ट २०१९ रोजी भारताच्या ७३ व्या स्वतंत्रता दिनानिमित्त यूरोप खंडातील सर्वोच्च शिखर माउंट एल्ब्रुस सर करून ७३ भारतीय ध्वजांचे ध्वज-तोरण फडकावून विश्व-विक्रम केला. याचीच नोंद हाई-रेंज बुक ऑफ रेकॉर्ड आणि इनक्रेडीबल बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये झाली आहे.

निलेश यांचाही सत्कार जगप्रसिद्ध समाजसेवक पद्मश्री प्रकाश आमटे आणि सौ. मंदाकिनी आमटे ह्याच्या हस्ते हेमलकसा येथे आयोजित कार्यक्रमात करण्यात आला होता.

वैभव आणि निलेश ह्या वर्षी ऑस्ट्रेलिया खंडातील सर्वोच्च शिखर माउंट कोसीउसको १५ ऑगस्ट, २०२० रोजी सर करून ७४ व्या स्वतंत्रता दिनानिमित्त ७४ भारतीय ध्वजाचे ध्वज तोरण फडकावून विक्रम करणार आहे.

वैभव आणि निलेश यांच्या कार्याचे *GM NEWS* परीवारा तर्फे अभिनंदन आणि त्यांच्या पुढील सामाजिक आणि गिर्यारोहण मोहिमेसाठी शुभेच्छा…