GM NEWS, गोड बातमी: पोलीसांची अशीही माणुसकी!! ५ वर्ष ताटातुट झालेल्या माय लेकरांची भेट घडवुन आणली गुन्हे अन्वेषण शाखेने!

0
271

उल्हासनगर दि.१२(गौतम वाघ)- अनैतिक मानवी वाहतुकीचे प्रमाणात चांगल्याच प्रकारे वाढ झाली असुन,त्यातीलच एक प्रकार १नं गुन्हे अन्वेषण शाखेने उघडकीस आणला आहे.१५ वर्षीय अल्पवयीन ५ वर्षा पुर्वी अज्ञात इसमाने कायदेशीर रखवालीतुन पळवुन नेल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती.त्याचा उलगडा आता झाला असुन अपर्हत मुलगा व माता पित्यांची भेट पोलीसांनी घालुन देताच आनंदा अश्रू चे पाट वाहु लागले.
कमला नेहरु नगर,शितला मंदिरा जवळ,धोबीघाट उल्हासनगर-१ येथे राहणाऱ्या सौ.सुनितादेवी नागेंद्र सिंग यांचा १५ वर्षीय अल्पवयीन मुलगा नामे कु.कृष्णा नागेंद्र सिंग यास अज्ञात इसमाने ११. वाजण्याच्या सुमारास कायदेशीर रखवालीतुन पळवुन नेल्याची तक्रार गुन्हा रजि.नं. I २४७/२०१५ भा.द.वी कलम ३६३ अन्वये नुसार दाखल करण्यात आला.
अपह्रत मुलाचा पत्ता लागत नव्हता,पण गुन्हे अन्वेषनचा संमातर तपास सुरुच होता,पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी दिलेल्या आदेशानुसार सहा.पो.आयुक्त गुन्हे,शोध-१ व प्रतिबंधक अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधक कक्ष आणि गुन्हे शाखा,उल्हासनगर यांनी ६/७ वर्षापूर्वी चे प्रकरणास पुन्हा वेग देऊन,नातेवाईक फिर्यादी,मिञ व बालसुधारगृह संस्था यांची बैठक घेवून,संदर्भात माहीती अदान प्रदान करित गोपनीय बातमीदारा मार्फत हरवलेल्या कृष्णा नागेंद्र सिंग याला दिल्लीतुन शोधुन काढले कृष्णा ने आपल्या जबाबात,५ वर्षापूर्वी रागावुन गेलो होतो,सुरुवातीचे तीन वर्षे भायखळा येथे काम करित होता,असे सांगितले.
सदरच्या कामगिरीस पोलीस आयुक्त विवेक फणसळकर,मा.सहा.पो.आयुक्त(शोध-१) किसन गवळी, सहा.पो.आयुक्त (प्रतिबंध) सुनील बाजारे यांचे मार्गदर्शनाखाली उल्हासनगर गुन्हे शाखेचे व.पो.नि.महेश तरडे, पो.नि.मनोहर पाटील,सहा पो.नि.झेंडे,पो.उप.निरीक्षक गणेश तोरगल,पो.ना.जगदीश कुलकर्णी,नवनाथ वाघमारे यांनी उत्तम कामगिरी केली.