GM NEWS,प्रेरणादाई बातमी:जामनेर तालुक्यातील आरोग्य कर्मचारी ग्रामस्थांची करत आहेत प्रात्यक्षीकासह जनजागृती

0
166

जामनेर,दि.२४ ( मिलींद लोखंडे ) : -कोरोना संसर्ग कसा टाळावा या विषयी आरोग्य कर्मचाऱ्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र वाकडी अंतर्गत कासली व चिंचखेडा येथे जनजागृती व हात धुण्याच्या पद्धती ग्रामस्थांना प्रात्यक्षीक करून समजवुन सांगीतल्या आहेत.
याबाबत सविस्तर वृत्त असे की सर्वत्र कोरोना या विषाणूने थैमान घातले असून यामुळे अनेक लोक बाधित होत आहेत . ग्रामीण भागात आरोग्य विभाग सक्रिय झाला असून प्राथमिक आरोग्य केंद्र वाकडी अंतर्गत कासली चिंचखेडा येथे लोकांना त्यांनी सँनिटायझर कसे वापरावे व आपले स्वतःचे आरोग्य कसे जपावे आदीबाबत प्रात्यक्षिक करुन दाखविले . या सोबतच कोरोना बाबत जनजागृती करण्यात आली . यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर किरण पाटील ,व्ही सी बी कराडे, आरोग्य सेविका ज्योती पाटील ,आरोग्य सेवक रवींद्र सूर्यवंशी तसेच पुंडलिक पाटील रोहित गोयर आधी कर्मचारी उपस्थित होते .या सोबत गावकरी मंडळी व सरपंच उपसरपंच यांनी सुद्धा यावेळी आरोग्य कर्मचाऱ्यांना सहकार्य केले .