GM NEWS,FLASH: कोरोना पार्श्वभूमीवर लोहारा येथे पेट्रोल पंप ३१ मार्च पर्यंत बंद राहणार असल्याची अफवा पेट्रोल पंपावर उसळली गर्दी . व्यवस्थापक अंकुर जैन यांनी मात्र अध्यादेश नसल्याचा केला खुलासा.

0
107

लोहारा,ता.पाचोरा दि. २३ ( ज्ञानेश्वर राजपुत ) : -कोरोना संसर्गजन्य आजाराबाबत जनजागृती पासून अफवांचे पेव हे संपूर्ण राज्यात सुरू आहेत याची प्रचिती लोहारा गावात जीवनावश्यक बाब म्हणून पेट्रोल पंपावर आल्याची दिसून आले पण असा काही आदेश नसल्याचे व्यवस्थापक अंकुर जैन यांनी माध्यम प्रतिनिधीकडे सांगितले ही अचानक अफवा पसरल्याने शेकडो दुचाकी-चारचाकी येथील एकमेव राज पेट्रोल पंपावर शेकडो रुपयांचे पेट्रोल टाकण्यासाठी तोबा गर्दी झाली होती हा प्रकार सायंकाळपासून सुरू होता यामुळे पेट्रोल पंप चालकाचा मात्र भलं! असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही कुठल्याही प्रकारची अफवा पसरवली पसरवणाऱ्यावर कारवाई करण्याचे अधिकार पोलिस प्रशासनाला शासनाने दिले आहे तरी या अफवा पसरवणाऱ्याचा शोध घेऊन कारवाई व्हायलाच पाहिजे भविष्यात तो मोठी अफवा पसरवून त्याच ध्येय गाठणारच? जनतेच्या मनात भीती निर्माण करून व सलोख्याला बाधा निर्माण करून अनुचित प्रकार घडवू शकतो याचा शोध व्हायलाच हवा अशी मागणी आम आदमी करतोय याचा पोलीस प्रशासन कसा शोध घेणार हे अजून तरी अनुत्तरित आहे. ही अफवा पसरल्याने जवळपास सायंकाळी ५ वाजेपासून रात्री ९ वाजेपर्यंत पेट्रोल टाकण्यासाठी आज मोठ्या प्रमाणात होते.