GM NEWS,FLASH:कर्फ्यू च्या दरम्यानही सर्व जीवनावश्यक सेवा सुरळीत सुरू राहतील.- जळगांव जिल्हाधिकारी,डॉ.अविनाश ढाकणे.

0
66

*नमस्कार*🙏

जळगाव जिल्हावासियानो,

जनता कर्फ्यु ला चांगला प्रतिसाद दिल्याबद्दल आपल्या सर्वाचे जिल्हा प्रशसनाच्यावतीने मनापासून आभार.🙏

पुढील 21 दिवसाच्या कर्फ्यूच्या काळात जीवनावश्यक सेवा बंद होणार नाहीत याची सर्वांनी नोंद घ्यावी.

*कर्फ्यू च्या दरम्यानही सर्व जीवनावश्यक सेवा सुरळीत सुरू राहतील*.

जनता कर्फ्यू च्या दरम्यान तसेच कालपासून आपल्या राज्यात लागू असलेल्या कलम 144 च्या अधिसूचनेत नमूद केलेल्या बाबी तशाच सुरू राहणार आहेत.
कोणीही अजिबात घाबरू नये. पण काळजी घेणे आवश्यक आहे.

सद्यस्थितीत किराणा माल, अन्नधान्य, भाजीपाला, फळे, दूध, औषधं, ATM, दवाखाने व इतर जीवनावश्यक वस्तू पुरवठा करणारे दुकाने व वितरक यांचेवर बंदी नाही.

वरील सर्व बाबी यापुढेही अव्याहतपणे सुरु राहतील.

सर्व नागरिकांना विनंती आहे की, वरील सर्व बाबी केवळ आवश्यकतेनुसारच खरेदी करावे.

गरजेपेक्षा जास्त खरेदी करून तुटवडा निर्माण होईल असे करू नये.

*त्यामुळे आवश्यक तेवढ्याच किराणा व इतर बाबींची खरेदी करावी*.

सर्व नागरिकांना विनंती आहे की, केंद्र, राज्य शासन व जिल्हा प्रशासन आपल्या सुरक्षेसाठीच हे सर्व करीत आहे.

तरी कृपया आपण सर्वांनी जिल्हा प्रशासनास सहकार्य करावे. व या काळात घराबाहेर पडू नये.

आपले प्रशासन, आपल्यासाठी..

घाबरू नका…पण जागरूक रहा,
कोरोना ला पिटाळून लावा.🙏🏻

डाॅ अविनाश ढाकणे
जिल्हाधिकारी, जळगाव