GM NEWS,आदर्श उपक्रम: कोरोनाच्या प्रतिबंधासाठी पहुर ग्राम पंचायत दक्ष.

0
198

पहुर,दि. २६ ( संतोष पांढरे ) : – जामनेर तालुक्यातील पहूर येथे ग्रामपंचायतीकडून ‘ कोरोना ‘च्या पार्श्वभूमीवर  दक्षता मोहिम राबविण्यात येत आहे .
पहूर गावात कोरोना या आजाराच्या पार्श्वभूमीवर शासनाकडून प्राप्त झालेल्या जमावबंदी आदेशाचे काटेकोर पालन करीत ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांनी काम करण्यासाठी कंबर कसली आहे .
सुधारित आदेशान्वये अत्यावश्यक सेवेत असलेल्या प्रतिष्ठांनावर अधिक प्रमाणात होत असलेली गर्दी पाहता आज रोजी दिनांक 26 सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास ग्रामपंचायत प्रशासनाने जीवानाश्यक वस्तूंची दुकाने बंद न करता गर्दी न करता दिलेल्या नियमा नुसार सुरू ठेवण्याचे दुकान मालकांना सक्तीचे निर्देश देण्यात दिले आहेत .