GM NEWS,Gre8 Breaking: भारत सरकार कडून मोठी घोषणा गोरगरीब जनतेसाठी अन्नधान्य खरेदीसाठी 1 लाख 70 हजार कोटी.कोरोना विरूद्ध लढणाऱ्या आशा वर्कर्स,नर्स,डॉक्टर यांना 50 लाखांच विमा कवच .

0
123

जामनेर दि. २६ ( मनोज दुसाने ) : – कोरोना संसर्गा मुळे संकटात सापडलेल्या जनतेला एक लाख 70 हजार कोटींचे गोरगरिबांसाठी पॅकेज मोदी सरकारने आज जाहिर केले आहे .कोरोणा व्हायरसमुळे भारत पूर्णपणे लॉक डाऊन झाला असून त्याला दिलासा देण्याचे काम केंद्राने व मोदी सरकार यांनी केले आहे उज्वला गॅस योजनेअंतर्गत ज्या महिलांनी गॅस कनेक्शन मिळाले आहेत त्यांना तीन महिने गॅस सिलेंडर फ्री मिळणार आहे . यात आठ कोटी लाभार्थ्यांना लाभ मिळणार आहे . कुणीही कष्टकरी व्यक्ती देशात उपाशी राहू नये अशी केंद्राची योजना पुढील तीन महिने मोफत धान्य देणार आहेत सुमारे 80 कोटी लोकांना हा लाभ मिळणार आहे . शेतकऱ्यांना महिना दोन हजाराची मदत ,वृद्ध दिव्यांगांसाठी एक हजार रुपये जनधन योजना, महिलांसाठी मोठी घोषणा महिलांना महिना पाचशे रुपयाची मदत ,मनरेगा अंतर्गत काम करणाऱ्या 5 कोटी कुटूंबाला देखील लाभ मिळणार आहे . या सोबतच कोरोना साठी युध्द पातळीवर काम करणाऱ्या डॉक्टर्स, नर्स, आरोग्य कर्मचारी, आशा वर्कर्स या सर्वांना 50 लाख रुपयांचे विमा संरक्षण सुद्धा देण्यात येणार आहे .
योजना सविस्तर खालील प्रमाणे : –
*अन-धन प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना*

आज जाहीर अन्न योजना मध्ये मोफत प्रतिव्यक्ती

5 किलो गहू
5 किलो तांदूळ
1किलो दाळ (राज्यनुसार वापर असलेली दाळ मिळेल.)

पुढील 3 महिने मिळणार..

*अन्नदाता*
अन्नदाता योजना मे किसन केलीये प्रतिमाह 2000 मिळणार…

*महिला*
महिलांसाठी जन-धन योजना 20 कोटी 500 रुपये मिळणार

*गॅस*
उज्वला योजनेतील महिलांना पुढील 3 महिने गॅस मोफत मिळणार..

*वृद्ध,विधवा महिला,दिव्यांग*
1000 रुपये प्रतिमाह 3 महिने सरकार देणार..

*मनरेगा*
मनरेगा अंतर्गत येणाऱ्या कामगार 5 कोटी लोकांसाठी प्रतिव्यक्ती 2000 रुपये मिळणार…

*कामगार*
मजुरांना 202 रु प्रतिदिन व 2000 रुपये देणार

*स्वयंसहायता समूह*
63 लाख स्वयंसहायता समूहाला प्रत्येकी 20 लाख देणार….