GM NEWS,प्रेरणादाई बातमी : जामनेरचे भुमिपुत्र गणेश माळी देत आहेत पुण्यातील गरजुंना मदतीचा हात . संवेदना फाऊंडेशनच्या वतीने १०० कुटुंबांना दीले अन्नधान्य.

0
197

जामनेर दि.३ ( मिलींद लोखंडे ) : – महाराष्ट्रात सर्वात प्रथम पुणे येथे कोरोनाचा रुग्ण आढळल्या मुळे पुर्ण पुणे लॉक डाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे येथे कामानिमित्त आलेल्या हातावर पोट असलेल्या कुटुंबांचे खुप हाल होत आहेत.परंतु या कठीण प्रसंगात सुध्दा त्यांना जामनेरच्या गणेश माळी या भुमीपुत्रामुळे पोटाला पोटभर अन्नधान्य मिळत आहे . मुळ जामनेर शहरातील रहीवाशी असलेले सध्या पुणे येथे स्थायीक झालेले गणेश माळी हे त्यांच्या संवेदना फाऊंडेशन या संस्थेच्या माध्यमातुन पुण्यातील या कष्टकरी कुटुंबांना मोफत अन्नधान्य घरपोच देत आहेत.
पुण्यातील शिवनेरी कोंढवा खुर्द भागातील ५ कुटूंबाना जीवनावश्यक वस्तू संवेदना फाऊंडेशन मित्र परिवार तर्फ देण्यात आज देण्यात आल्या आहेत . आपण ‘आमच्यासाठी खुप महत्वाचे आहात’,तुम्ही आज महान देशकार्य करण्यासाठी व देशाला वाचवण्यासाठी घरात राहुनच देशभक्ती करा.कोरोना या भयंकर महामारीत संवेदना फाऊंडेशन मित्र परिवार तुमच्या सोबत आहे.आपण घरीच रहा बाहेर फिरू नका.असे आवाहन गणेश माळी हा जामनेरचा हा सुपुत्र पुण्यात करत आहे .
                 संवेदना फाऊंडेशनच्य वतीने शिवनेरी नगर कोंढवा भागातील हातावर पोट असणाऱ्या १०० कुटुंबाला राशन वाटप करण्यात आले आहे .त्यांच्या सोबत संवेदना फाऊंडेशनचा मित्र परिवार रामा सोनवणे ,सोपान खराटे, योगीराज माळी ,अरुण माळी हे सुध्दा या समाज कार्यात त्यांना मदत करत आहेत./गणेश माळी यांनी संवेदना फाऊंडेशन या संस्थेच्या माध्यमातुन पुण्यासह सर्व महाराष्ट्रात अनेक उपक्रम राबविले असुन त्यांच्या या सेवाभावी कार्याला GM NEWS चा सलाम