GM NEWS,FLASH: पाळधी येथे प्रधानमंत्री गरीब कल्याण योजने अंतर्गत तांदूळ वाटपास सुरुवात . अंत्योदय व प्राधान्य गटाला मिळणार लाभ,ऑफलाइन शिधापत्रीकाधारक मात्र योजनेपासुन वंचित .

0
279

पाळधी ता जामनेर,दि.१५ ( योगेश कोळी ) : – येथे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री योजने अंतर्गत रेशनकार्ड धारकांना मोफत तांदूळ वाटपास सुरुवात करण्यात आली येथे दोन स्वस्त धान्य दुकान असून एक सोसायटीचे व एक खाजगी आहे दोन्ही ठिकाणी आज प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत प्रत्येक व्यक्तीस पाच किलो तांदूळ वाटपास सुरुवात झाली
पाळधी येथील स्वस्त धान्य दुकानदार सागरमल उत्तमचंद जैन यांचेकडे एकूण ६०० कार्ड असून ३३४५ युनिट आहेत यातील प्रत्येक कार्ड धारकास ५०० ग्रॅम गुळ भेली मोफत,व ना नफा ना तोटा या तत्वावर प्रत्येक कार्ड धारकास १तेल बॅग उपलब्ध करून देण्यात येत आहे तसेच सोसायटी अंतर्गत स्वस्त धान्य दुकानात ४३८कार्ड धारक आहेत येथे सुद्धा प्रती व्यक्तीस मोफत ५ किलो तांदूळ वाटप करण्यात येत आहे देशातील गोर गरीब व बेरोजगारीचे प्रमाण जास्त असून प्रधानमंत्री गरीब जनकल्याण योजनेतून तीन महिन्याचे धान्य देऊ केले आहे त्यातील पहिल्या टप्प्यातील धान्य दुकानदारांना प्राप्त झाले असून दुकानदारांकडून वाटप हि युद्ध पातळीवर सुरु आहे तसेच पाळधी गावातील ज्या लाभार्थ्यांची शिधापत्रिका ऑनलाईन झालेली आहे त्यांना धान्य वाटप करण्यात येत आहे परंतु ज्या लाभार्थ्याजवळील शिधा पत्रिका ऑफलाईन आहे त्यांना मात्र या योजनेपासून मुकावे लागत आहे
यावेळी जि प सदस्या प्रमिला पाटील,सरपंच सोपान सोनवणे, पोलीस पाटील वैशाली पाटील,मा जि प सदस्य कैलास पाटील, तलाठी प्रमोद इंगळे, कोतवाल रतन गायकवाड, सिकंदर तडवी,ग्राम समिती सदस्य आदीच्या उपस्थितीत धान्य वाटपास सुरुवात झाली नागरिकांनी सोशल डिस्टनसिंगचे पालन करून शांततेत धान्य घ्यावे असे आवाहन धान्य दुकांनदारा कडून करण्यात आले आहे