Vayu Cyclone 48 तासात कच्छ किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता

0
44

मुंबई : ‘वायू’ चक्रीवादळाने पुन्हा आपला मार्ग बदलला आहे, त्यामुळे गुजरातवरील संकट अद्याप कायम आहे. चक्रीवादळ येत्या 48 तासात गुजरातच्या कच्छ किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, वायू चक्रीवादळ 16 जूनला आपला मार्ग बदलेल आणि 17-18 जूनपर्यंत कच्छच्या परिसरात दाखल होईल. मात्र यावेळी चक्रीवादळाची तीव्रत कमी होण्याची शक्यता आहे. हे चक्रीवादळ ‘डीप डिप्रेशन’ म्हणून किनारपट्टी भागात पोहचण्याची शक्यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here