GM NEWS, दखल बातमीची : कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक प्रतापराव इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली जामनेर पोलीसांनी उध्वस्त केल्या तळेगांव गावातील गावठी दारूच्या भट्टया .

0
806

तळेगाव, ता. जामनेर दि .२२ ( डॉ. गजानन जाधव ) : – तळेगाव येथे मोठ्या प्रमाणात हातभट्टीची दारू विकली जात असल्याने गावकऱ्यांना पार वैताग आला होता व त्रास होत होता त्यामुळे त्यांनी ग्रामपंचायत मध्ये जाऊन पोलीस पाटील व सरपंच यांच्याकडे जाऊन तक्रार केली होती . सरपंच पोलिस पाटील यांनी पोलीस स्टेशन गाठून पोलीस निरीक्षक प्रतापराव इंगळे यांच्या कडे तक्रार दिली त्यानुसार आमच्या GM NEWS ने सुध्दा ही बातमी प्रसिद्ध केली त्यामुळे जामनेर पोलिसांनी कार्यतत्परता दाखवून तात्काळ कारवाई करत गावातील बहुसंख्य हातभट्ट्या फोडल्या तसेच त्यांचे रासायनिक नष्ट करून सामान देखील नष्ट केले आहे . जामनेर पोलिसांचे या धडक कारवाई मुळे कौतुक होत असून पोलिसांनी असेच नेहमी तत्पर राहून गावकऱ्यांना व्यसनाधीन ते पासून वाचवावे अशी अपेक्षा गावकरी करीत आहे . तसेच काही उर्वरित दारुच्या भट्टया राहिल्या असल्यास त्या सुद्धा लवकरात लवकर नष्ट करून गावकऱ्यांना हात भट्टी पासून मुक्ती द्यावी अशी माफक अपेक्षा गावकरी करीत आहेत .व पोलिसांचे या कारवाईबद्दल गावकरी अभिनंदन करीत आहेत . जामने पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक प्रतापराव इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली हे कॉ विठ्ठल काकडे ,राहुल पाटील,राजपूत होमगार्ड अरुण कोळी आदींच्या धडाकेबाज सिंघम पथकाने आजची ही कारवाई केली आहे . जामनेर पोलिसांच्या या धडाकेबाज कार्यवाही मुळे तळेगावकर ग्रामस्थ पोलिसांचे आभार व्यक्त करत आहेत .