जांभोरे शिवारात अज्ञात वाहनाने मारला कट – अपघातात तरडेचा युवक ठार

26

धरणगाव- तालुक्यातील जांभोरे शिवारात पारोळ्याकडून धरणगावकडे मोटारसायकलवर येणाऱ्या पिता-पुत्रांना अज्ञात वाहनाने कट मारल्यामुळे झालेल्या अपघातात तरडे ता.पारोळा येथील यूवक ठार झाला तर त्याचे पिता जखमी झाल्याची घटना १२ रोजी घडली.
या अपघातात मृत पावलेला गुलाब जोरसिंग चव्हाण (वय ३५) हा मुंबई महापालिकेत सेवेत कार्यरत होता. त्याला पदोन्नतीसाठी इंजिनियर व्हायचे असल्याने त्यासंदर्भात माहिती घेण्यासाठी तो वडिल जोरसिंग महारु चव्हाण यांच्या सोबत १२ रोजी दुपारी मोटारसायकल क्र.एम.एच.१९/सीएम.८९३० ने धरणगावकडे येत असतांना जांभोरे शिवारातील गोटू काबरा यांच्या शेताजवळ एका अज्ञात वाहनाने त्यांना कट मारल्याने त्यांची मोटारसायकल झाडावर आदळली.