GM NEWS, धक्कादायक वृत्त: साथ रोग आपत्तीच्या काळात शासनाचे आदेश झुगारून शेंदूर्णी नगरपंचायत मुख्याधिकाऱ्यांची दांडी. नागरिकांचे आरोग्य वाऱ्यावर.

0
558

शेंदुर्णी,ता.जामनेर ,दि.25 ( विलास पाटील ) : – शेंदुर्णी नगरपंचायत मुख्याधिकारी साजीद पिंजारी हे साथरोग आपत्तीच्या काळात मुख्यालयी थांबत नसल्याने नागरिकांनी रोष व्यक्त केला असून कमल किसन नगर व परिसरातील ४० नागरिकांनी आपल्या सह्यांचे निवेदन नगर पंचायत कार्यालयाला कुलूप असल्याने पीएसआय किरण बर्गे यांच्याकडे सोपविले व आपला संतापही बोलून दाखविला आहे .

शेंदुर्णी नगरपंचायत कार्यालयाच्या नियोजन शून्य कारभाराचा प्रत्यय नागरिकांस अनुभवयास येत असुन गावाबाहेर भरणारा आठवडे बाजार नगरपंचायतीने रीतसर व्यापाऱ्यांकडून पावत्या फाडून महिन्याभरापासून गावाच्या मध्यवस्तीत भरविल्या जात असल्याने नागरिकांमध्ये संतापाचा उद्रेक पाहावयास मिळाला तो उद्रेक संपतो न संपतो तोच संशयित नागरिकांना मध्य वस्तीत आणून आजाराला निमंत्रण देण्याचे काम नगरपंचायत सारख्या स्थानिक स्वराज्य संस्थेचे मुख्याधिकारी करीत असल्याने नागरिकांनी संतप्त भावना व्यक्त केल्या आहेत
काल रात्री अकरा वाजता अचानक पारस मंगल कार्यालया जवळ साफसफाई व बॅरिकेट लावण्याचे काम सुरू करण्यात आले त्यावेळी उपनगराध्यक्ष पती व इतर नगरसेवक उपस्थिती बद्द्ल नागरिकांनी संतापही व्यक्त केला आहे अधिक माहिती घेतली असता येथे विलगीकरण कक्ष उभारण्याचे काम सुरू असल्याचे समजले सदर क्वारेंटाईन सेंटर गावाच्या भर वस्तीत उभारत असल्याने नागरिकांमध्ये पुन्हा संताप व असंतोषाचे वातावरण नगरपंचायतच्या विरोधात दिसून आले आहे .

शेंदुर्णी शहरात प्राथमिक आरोग्य केंद्राची दोन एकर जागा व इमारत उभी असताना भर वस्तीत क्वारेंटाइन सेंटर उभारण्याची गरज काय असा सवाल नागरिक सुनील गुजर यांनी केला
नागरिक नगरपंचायती ला गेले असताना तेथे भलेमोठे कुलूप लावलेले पाहून नागरिक अवाकच झाले आपत्ती व्यवस्थापन कायदा सुरू असताना सात रोग निवारण कक्ष व इतर सोयी सुरू असावयास हव्या होत्या मात्र तेथे कोणीही नसल्याने नागरिकांनी पोलीस उपनिरीक्षक किरण बर्गे यांना निवेदन दिले यावेळी परिसराचे नेते राजेंद्र भारुडे, रवी गुजर सुनील गुजर ,भैया सूर्यवंशी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या गावाच्या एक किलोमीटर शाळा व जिनिंग उपलब्ध मग त्याचा विचार न करता मध्यवस्तीत क्वारेंटाईन सेंटर उभारण्यात सत्ताधाऱ्यांना काय स्वारस्य आहे असा सवालही वस्तीतील नागरिकांनी उपस्थित करण्यात आला आहे.