GM NEWS, खान्देशवासीयांनो सावधान: धुळे जिल्ह्यात आणखी तीन रुग्णांचा अहवाल कोरोना विषाणू पॉझिटिव्ह .

0
857

धुळे, दि. 26 ( मिलींद लोखंडे ) : – श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय, धुळे येथे दाखल आणखी तीन रुग्णांच्या स्वॅबचे नमुने कोरोना विषाणूचे पॉझिटिव्ह आले आहेत. अन्य 15 रुग्णांच्या कोरोना विषाणूच्या अहवालाची प्रतीक्षा आहे. त्यामुळे धुळे जिल्ह्यातील कोरोना विषाणूच्या पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 24 झाली आहे. तीनही पॉझिटिव्ह रुग्ण धुळे शहरातील आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.