GM NEWS, कौतुकास्पद उपक्रम: संजयदादा गरूड यांच्या वाढदिवसा निमित्त शेंदूर्णी येथील पोलीस व पत्रकारांना प्रा.दिनेश पाटील यांचे कडून सॅनिटायझर व मास्कचे वाटप.

0
420

शेंदूर्णी,दि.२७ (विलास आहिरे -पाटील ) : – कोरोना सारख्या राष्ट्रीय आपत्तीच्या वेळी पोलीस रस्त्यावर उतरून जनतेच्या जीवितांचे रक्षण करण्यासाठी धडपडत आहेत तर पत्रकार आपला जीव धोक्यात घालून वृत्त संकलन करून दैनंदिन घडामोडीची माहिती व कोरोना विषयी जनजागृती करण्यात पुढाकार घेत आहे या कार्याची दखल घेऊन धी शेंदूर्णी सेकंडरी एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन व शेंदूर्णी-नाचनखेडा जि.प. गटाचे माजी जि.प. सदस्य संजय गरुड यांच्या वाढदिवसाचे निमित्ताने काल दिनांक २६/४/२० रोजी येथिलच अप्पासाहेब र.भा.गरुड विद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी प्रा.डॉ.दिनेश पाटील यांनी यानिमित्ताने एक आगळा वेगळा उपक्रम राबविला त्यांनी शेंदूर्णी शहरातील सर्व पत्रकार व पहुर,शेंदूर्णी येथिल पोलीस बांधवांना सॅनिटायझर व मास्कचे वाटप केले.सोशियल डिस्टन्सचे सर्व नियम पाळून विविध उपक्रमांनी साजरा झालेल्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात पत्रकार व पोलीस कर्मचाऱ्यांच्या या कार्याची दखल प्रा.डॉ.दिनेश पाटील यांनी घेतली व कोरोना सुरक्षा किट दिले या आगळ्या वेगळ्या उपक्रमाचे पोलीस व पत्रकार बांधवांनी स्वागत केले आहे. पहुर पोलीस स्टेशनचे पीएसआय किरण बर्गे यांनी पोलिसांचे वतीने तर पत्रकाराचे वतीने विलास अहिरे यांनी मास्क, सॅनिटायझर किट स्वीकारले. व प्रा. दिनेश पाटील यांचे उपक्रमाबद्दल आभार व्यक्त करण्यात आले आहे.