GM NEWS,दीलासादायक वृत्त: जामनेर तालुक्यातील नेरी दिगर येथील ‘त्या’ कोरोना संशयीत मृत युवकाचा अहवाल निगेटीव्ह. अहवाल निगेटीव्ह आलेला असला तरी नेरी गाव खबरदारी म्हणुन ५ दिवस लॉक डाऊनच राहणार.ग्रामस्थांचा ठाम निर्धार .

0
2304

जळगांव,दि.२९ (मिलींद लोखंडे ) : – जळगांव कोवीड रुग्णालयात उपचारा दरम्यान काल दि.२८ एप्रिल रोजी मृत्यु पावलेल्या नेरी दि. येथील संशयीत युवकाच्या स्वॅब नमुन्याचा तपासणी अहवाल निगेटीव्ह आला आहे.
मयत युवकाला दि. २३ एप्रिल रोजी जळगांव कोवीड रुग्णालयात दाखल करण्यात आलेले होते. या ठीकाणी त्याच्यावर उपचार सुरु होते. परंतु उपचार सुरु असतांनाच त्याचा मृत्यु काल दि.२८ एप्रिल रोजी झाला होता. त्यामुळे जामनेर तालुका चिंताग्रस्त झालेला होता .सर्वांच्या नजरा मृत युवकाचा अहवाल नेमका काय येतो या कडे लागलेल्या होत्या अखेर धुळे प्रयोगशाळे कडुन हा अहवाल आज प्राप्त झाला असुन तो निगेटीव्ह आल्याने जामनेर तालुकावासीयांसह प्रशासनाला दीलासा मिळाला आहे .

मृत युवकाच्या मृत्युचे कारण मात्र स्पष्ट होऊ शकले नाही .त्याचा अहवाल मात्र आज निगेटीव्हप्राप्त झाला असल्याचे शासकीय वैदयकीय महाविद्यालयाचे डीन डॉ . भास्कर खैरे यांनी सांगीतले आहे