अर्जेंटीनाचे शिष्टमंडळ भेटले कृषीमंत्र्यांना -कृषी संबधीत सामंजस्य करार प्रस्तावावर चर्चा -दोन्ही देशादरम्यान कॄषी व्यवसायास मिळणार चालना…..

0
83

अर्जेंटीनाचे शिष्टमंडळ भेटले कृषीमंत्र्यांना
-कृषी संबधीत सामंजस्य करार प्रस्तावावर चर्चा
-दोन्ही देशादरम्यान कॄषी व्यवसायास मिळणार चालना

मुंबई:अर्जेन्टिनाचे कृषीउद्योग सचिव डॉ. ल्युईस ईचलव्हेअर यांच्या समवेत सहा जणांच्या शिष्टमंडळाने आज राज्याचे कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांची मंत्रालयात भेट घेतली. यावेळी त्यांनी कृषी व्यवसायाशी संबंधित सामंजस्य करार करण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याबाबत चर्चा केली. या माध्यमातून दोन्ही देशातील कृषी व्यावसायास चालना मिळण्यास मदत होईल, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

या भेटी दरम्यान अर्जेंटिनाच्या शिष्टमंडळाने शेती उत्पादन साठविण्याच्या पद्धती, उत्कृष्ट दर्जाच्या बियाणांची उपलब्धता, सेंद्रिय कीटकनाशके व दोन्ही देशांचे हंगामी उत्पादन यावर चर्चा केली. यावेळी कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले, दुग्धव्यवसाय विभागाचे आयुक्त नरेंद्र पोयाम, मत्स्यव्यवसाय विभागाचे आयुक्त सुमंत भांगे, महानंद डेअरी चे व्यस्थापक एम व्ही चौधरी, महानंद डेअरी चे व्यवस्थापकीय संचालक जी सी मंगळे, सामान्य प्रशासन विभागाचे राजशिष्टाचार श्रीधर देशमुख त्याचबरोबर कृषि व पदुम विभाग, दुग्धव्यवसाय, मत्स्यव्यवसाय विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

four × 2 =