GM NEWS,वेदनादाई बातमी : लॉक डाऊन मुळे गुजरात राज्यात अडकलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची मदतीसाठी आर्त हाक.

0
1368

जामनेर जि.जळगांव,दि.३० ( मिलींद लोखंडे ) : – कोरोना लॉक डाऊन मुळे महाराष्ट्रातील सुमारे 62 रेल्वे अॅप्रेटीस प्रशिक्षण घेणारे विद्यार्थी गुजरात राज्यातील रांधणपुर परीसरात अडकुन गेलेले आहेत.
रेल्वे अॅप्रेटीस प्रशिक्षणार्थी म्हणुन हे 62 विद्यार्थी गुजरात राज्यातील रांधणपुर परीसरातील वेगवेगळ्या रेल्वे स्टेशनवर प्रशिक्षण घेत होते. यातील बहुतांश विद्यार्थी हे जळगांव जिल्हयातील आहेत . या सर्वांचे प्रशिक्षण 10 एप्रिल पर्यत पुर्ण झालेले असुन लॉक डाऊन झाल्यामुळे हे विद्यर्थी प्रशिक्षण ठीकाणी अडकुन पडलेले आहेत . रेल्वे प्रशासनाने त्यांना दीलेली तुटपुंजी अन्नधान्याची मदत सुध्दा संपलेली आहे त्यामुळे या विद्यार्थ्याना उपाशीपोटी राहण्याची वेळ आलेली आहे . विद्यार्थ्या जवळ पैसे नसल्याने बाहेर बाजारातुन सुद्धा किराणा सामान आणु शकत नाही आणी घरी महाराष्ट्रात सुध्दा जाऊ शकत नाही अशी बीकट समस्या या विद्यार्थ्याची झाली आहे . या विद्यार्थ्यानी रेल्वे प्रशासनाला आम्हाला तुम्ही महाराष्ट्रात आमच्या घरी सोडा विनंती केली परंतु लॉक डाऊन संपल्या नंतरच तुम्हाला जाता येईल असे येथील रेल्वे प्रशासनाने सांगितले आहे .
गुजरात राज्यात अडकलेले महाराष्ट्रातील हे रेल्वे प्रशिक्षणार्थी विद्यार्थी प्रचंड घाबरलेले असुन त्यांच्या जवळ असलेल पैसे आणी अन्नधान्य सुद्धा संपलेले आहे त्यामुळे आम्हाला येथुन घेऊन चला अशी आर्त हाक या विद्यार्थ्यानी दीली आहे .