GM NEWS,FLASH: कोरोना आपत्ती काळातील योद्धा जामनेर तालुका मलेरिया सुपर वायझर विजय वानखेडे ३२ वर्षांच्या सेवेनंतर सेवानिवृत्त.

0
359

शेंदूर्णी,ता.जामनेर दि.१ मे ( विलास पाटील) : – जामनेर तालुका आरोग्य पर्यवेक्षक व महाराष्ट्र राज्य हिवताप व हत्तिरोग कर्मचारी मध्यवर्ती संघटना जिल्हा शाखा जळगावचे जिल्हा सरचिटणीस म्हणून कार्यरत विजय माधवराव वानखेडे हे ३१ वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर काल ३० मे २०२० रोजी सेवानिवृत्त झाले असूूून संघटना राज्य शाखेचे सर्व पदाधिकाऱ्यांनी त्यांचा सेवानिवृत्ती निमित्ताने सत्कार केला. विलास पाटील(पत्रकार शेंदूर्णी) यांनी त्यांच्या घरी जाऊन कोरोना प्रतिबंधक सॅनिटाझयर भेट देऊन सेवा निवृत्ती निमित्त अनोखा सत्कार केला व भावी आयुष्यात सुख समृद्धी प्राप्त होण्यासाठी कामना केली तर माजी जिल्हा परिषद सदस्य व राष्ट्रवादीचे नेते संजय गरुड यांनीही विजय वानखेडे यांनी प्रदीर्घ सेवाकाल पूर्ण करून आरोग्य खात्यात केलेल्या कार्याचा गौरव करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. कोरोना आपत्तीतील योद्धे शेंदूर्णी येथील रहिवासी विजय माधवराव वानखेडे हे महाराष्ट्र राज्य आरोग्य खात्यातील आपली ३२ वर्षाची सेवा बजावून काल दिनांक ३०/४/२०२० रोजी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले आहेत. सेवेत असतांना जामनेर,शेंदूर्णी, पाचोरा,लोहटार भुसावळ, जळगाव या विविध गावांमध्ये मलेरिया सुपरवायझर म्हणून सेवा कार्य केले असून पदोन्नती नंतर तालुका आरोग्य सुपरवायझर म्हणून भुसावळ , जामनेर येथे कार्यरत होते.