GM NEWS, Big Breaking: 3 मे नंतर देशात पुन्हा अजुन दोन आठवडे लॉक डाऊन.

0
777

नवी दिल्ली, दि,१ मे (GM NEWS, वृत्तसेवा ) : – देशभरातील लॉकडाउन दोन आठवड्यांनी वाढवण्याची घोषणा केंद्र सरकारनं केली आहे. यासंदर्भात केंद्र सरकारनं एक पत्रक जारी केलं आहे. ३ मे रोजी लॉकडाउनचा दुसरा टप्पा पूर्ण होणार होता. त्यापूर्वीच पुन्हा एकदा लॉकडाउन वाढवण्याची घोषणा सरकारनं केली आहे. या लॉकडाउन दरम्यान रेड झोनमधील कोणत्याही भागांना सवलत देण्यात येणार नसल्याचं सरकारनं स्पष्ट केलं आहे.

४ मेपासून पुढील दोन आठवडे हा लॉकडाउन लागू असणार आहे. या काळात विमान आणि रेल्वे वाहतूक सुरू करण्यात येणार नसल्याचेही केंद्र सरकारनं स्पष्ट केलं आहे.

दरम्यान, हा लॉकडाउन लागू करताना सरकारनं ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये सशर्त काही सवलती देण्यात येतील. परंतु रेड झोनमध्ये कोणतीही सवलत देण्यात येणार नसल्याचं सरकारनं स्पष्ट केलं आहे. रेड झोन, ऑरेंज झोन आणि ग्रीन झोन्ससाठी नव्या गृहमत्रालयानं काही नव्या गाईडलाइन्सही जारी केल्या आहेत. तसंच ज्या जिल्ह्यांचा समावेश रेड किंवा ग्रीन झोनमध्ये नसेल ते जिल्हे ऑरेंज झोनमध्ये सामिल करण्यात येणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे.

करोना संकटादरम्यान, आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय मंत्री आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत एक महत्त्वाची बैठक घेतली होती. यानंतर सायंकाळी हा निर्णय जाहीर करण्यात आलाय. या बैठकीत गृह मंत्री अमित शहा, रेल्वे मंत्री पीयूष गोयल, केंद्रीय उड्डाण मंत्री हरदीप पुरी आणि आरोग्य मंत्री हर्षवर्धन हेदेखील उपस्थित होते. या बैठकीत करोना लॉकडाऊनच्या दुसऱ्या टप्प्याची समिक्षा करण्यात आली आहे .

लॉकडाऊन १७ मे पर्यंत असणार आहे .