GM NEWS, आनंदाची बातमी @Big Breaking: लॉक डाऊन नंतर आज अखेर पहिली रेल्वे धावली . नाशिक रोड येथुन भोपाल साठी 350 प्रवासी घेऊन रात्री.9.30 वा. श्रमीक एक्सप्रेस रवाना.

0
635

नाशिक रोड ,दि.1 मे ( मिलींद लोखंडे ) : – कोरोना लॉक डाऊन नंतर देशातील जिवनवाहीनी म्हणुन ओळख असलेल्या भारतीय रेल्वेची सेवा सुध्दा ठप्प झाला होती. परंतु आज महाराष्ट्र दिनाच्या दिवशी रेल्वे प्रशासनाने  नाशिक रोड ते भोपाल विशेष श्रमीक एक्सप्रेस नाशिक रोड स्टेशनवरून आज रात्री 9.30 वा. रवाना करून रेल्वे विभागाने प्रवाशांना सुखद धक्का दिला आहे .
नाशिक रोड स्टेशन वरून 6 बोगी असलेली ही पुर्णतः सुरक्षीत विशेष रेल्वे एक्स्प्रेस 350 प्रवासी घेऊन भोपालच्या दिशेने आज यशश्वीरित्या रवाना झाली आहे . नाशिक शहरासह परीसरातील कोरेनटाईन असलेल्या नागरीकांची वैद्यकीय तपासणी अंती या विशेष रेल्वेने आज रवानगी करण्यात आल्याची माहिती सुत्रां कडुन प्राप्त झाली आहे .
नाशिक रोड ते भोपाल दरम्यान    धावणारी ही विशेष श्रमीक एक्सप्रेस फक्त टेक्नीकल हॉल्ट वगळता इतर कोणत्याच स्टेशनवर थांबणार नसल्याची माहिता सुत्रां कडुन प्राप्त झाली आहे . लॉक डाऊन नंतर महाराष्टातुन ही पहिली विशेष रेल्वे धावल्याने आणी यानंतर अधिकृतपणे वैद्यकीय सोपस्कर पार पाडुन नोंदणी केल्या नंतर इतर प्रवांशाना इच्छीत ठीकाणी आता जाता येणार असल्याने जनतेने शासनाचे आभार व्यक्त केले आहेत .

प्रवाशांना सूचना-
*रेल्वे स्थानकांवर विनाकारण गर्दी करू नका*
महाराष्ट्रातुन परराज्यात रेल्वेने जाणाऱ्या नागरिकांसाठी स्थानिक नोडल अधिकाऱ्यां मार्फत नाव नोंदण्याची व्यवस्था करण्यात येत आहे, ही सर्वस्वी राज्यांची जबाबदारी असल्याने जोपर्यंत सबंधितांकडून काहीही कळविण्यात येत नाही तोपर्यंत रेल्वे स्थानकांवर गर्दी करू नये, व सध्यातरी अशा विशेष ट्रेन्स मध्ये नोंदणीकृत केलेल्या व्यक्तींनाच प्रवेश असेल,
🌹🌹🌹🌹🌹🌹
*ट्रेन लाईव्ह प्रवाशी संघटना*