GM NEWS, प्रेरणादाई बातमी : माजी मंत्री आ.गिरीष महाजनांच्या प्रयत्नांनी लोहारा कुऱ्हाड सर्कल मधील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र व खाजगी वैद्यकीय व्यावसायिक यांना मिळाले पीपीई किट . निरामय सेवा संस्था, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भाजपा, जी.एम.फाऊंडेशनचा मदतीचा हात .

0
302

लोहारा. ता. पाचोरा दि.०३ ( चंद्रकांत पाटील ) :- लोहारा कुऱ्हाड सर्कल मधील प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रात कार्यरत आलेल्या वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी तसेच लोहारा कुऱ्हाड सर्कल मध्ये खाजगी वैद्यकीय सेवा देणारे सर्व डॉक्टर बंधूंना माजी मंत्री आ.गिरीष महाजन यांच्या प्रयत्नांनी निरामय सेवा संस्था, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भाजपा, जी.एम.फाऊंडेशनकडून ५०पीपीई किट सुपूर्द करण्यात आले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यासाठी माजी मंत्री आ.गिरीष महाजन यांच्या प्रयत्नांनी ३५०० पीपीई किट आणि ८ हजार लीटर सॅनिटायझर उपलब्ध झाले होते. यावेळी लोहारा उपसरपंच कैलास आप्पा चौधरी, जेष्ठ नेते शरद अण्णा सोनार डॉ केयुर चौधरी, नितीन आण्णा गवळी,संदीप राजपूत, ईश्वर जगदीश भाऊ तेली किरण भाऊ पाटील संजय पाटील गोपाल देसले गोपाल पाटील गुलाब दादा पाटील मनोज आप्पा पाटील विजुभाऊ पाटील आदी उपस्थित होते.
किट देतांना सोशल डिस्टनसिंग चे योग्य पालन सर्व कार्यकर्त्यांनी केले.