GM NEWS,धक्कादायक वृत्त: चिंचखेडा तवा येथे कोरेनटाईन केलेल्या कुटुंबांना सुविधा नसल्याने कुटुंब सैरभैर. बाहेर राज्यातुन आलेले १३ कुटुंब राहत आहेत उघड्यावर.

0
1491

जामनेर,दि.५ ( मिलींद लोखंडे ) : – कोरोना लॉकडाऊन मध्ये अडकलेल्या स्थलांतरीत मजुरांना त्यांच्या मुळ गावी जाण्याची परवानगी मिळाल्या नंतर जामनेर तालुक्यात सुध्दा बाहेर गावी गेलेले मजुर परत येत आहेत . चिंचखेडा तवा या गावातील गुजरात सुरत येथे कामा निमित्त गेलेले १४ कुटुंब सुध्दा दि.१ मे च्या रात्री गावी परतले आहेत . या कुटुंबांतील सुमारे ७६ लहान मोठ्या लोकांना येथील स्थानिक ग्रा.पं. प्रशासनाच्या वतीने गावाबाहेरच्या एका शेतामध्ये उघड्यावरच कोरेंटाईन करण्यात आले आहे .
संस्थात्मक पध्दतीने या १३ कुटुंबांना या ठीकाणी स्थानिक ग्रा.पं प्रशासनाच्या वतीने कोणतीच सुविधा पुरविण्यात येत नसल्यामुळे हे सर्व कुटुंब गावातील नातेवाईंका कडे दिवसभर थांबुन रात्री पुन्हा शेतातील उघड्यावरील कोरेंटाईन केंद्रावर फक्त झोपायला येत असल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे .
चिंचखेडा तवा ग्रामपंचायत प्रशासन आणि येथील पोलीस पाटील या गंभीर बाबी कडे दुर्लक्ष करत असल्याचे गावात बोलल्या जात आहे . हे सर्व १३ कुटुंब जर विलगीकरण करून सुद्धा त्यांना प्रशासनाच्या वतीने कोणतीच सेवा सुविधा मिळत नसल्याने गावामध्ये येत आहेत . त्यामुळे त्यांना फक्त देखावा म्हणुन विलगीकरण करून काय उपयोग ? कोरोनाचा संसर्ग वाढु नये म्हणुन खबरदारीचा उपाय म्हणुन कोरोना बाधीतांच्या संपर्कातील अथवा बाहेर गावावरून आलेल्यांना होम कोरेनटाईन किंवा संस्थात्मक कोरेनटाईन केले जाते परंतु चिंचखेडा तवा गावातील स्थानिक प्रशासन मात्र कुंभकर्णी झोपेत असल्याचे दिसत आहे . चिंचखेडा तवा या गावामध्ये या कोरेंटाईन कुटुंबातील एखादा व्यक्ती जर बाधीत असला आणि त्याच्या मुळे इतरांना बाधा झाली तर याला जबाबदार कोण ?

प्रशासनाने या गंभीर बाबीची दखल घेऊन कोरेनटाईन केलेल्या या कुटुंबांना योग्य ठीकाणी कोरेनटाईन करून त्यांना सुविधा पुरवाव्यात या सोबतच येथे देखरेखीसाठी कर्मचारी / स्वयंसेवक नेमण्याची मागणी गावातील सुज्ञ ग्रामस्थांनी केली आहे .