शेंदुर्णी येथे 30 जुलै ते 8 ऑगस्ट दरम्यान मोडी लिपी प्रशिक्षण वर्गाचे आयोजन .

0
272

 


  1. जळगाव.दि.22 ( मिलींद लोखंडे ):- महाराष्ट्र शासनाच्या पुराभिलेख पर्यटन व सांस्कृतिक संचालनालयामार्फत दिनांक 30 जुलै ते 8 ऑगस्ट 2019 दरम्यान आप्पासाहेब र. भ. गरूड कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, शेंदुर्णी, ता.जामनेर जि.जळगाव येथे जिल्ह्यातील शासकीय/निमशासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांसाठी मोडी लिपी प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आलेले आहे. महाराष्ट्रात सुमारे 12 व्या शतकापासून मोडी लिपीची सरुवात झाली. असे इतिहासकारांचे मत आहे. न मोडता, न थांबता, झरझर लिहिली जाणाऱ्या या लिपीस मोडी लिपी असे संबोधण्यास आले. आजची स्टेनोग्राफरची जी सांकेतिक लिपी आहे. तशाच प्रकारचे स्वरूप मोडी लिपीतील लिखाणामागे होते. श्री.हेमाद्रीपंत हे या मोडी लिपीचे जनक होते. भाषा जरी मराठी असली तरी तिची लिपी ही मोडी असल्याने तिला फार महत्व प्राप्त झाले आणि ह्या मोडीचा सर्रास वापर राजकारभारातून व लोकांच्या दैनंदिन जीवनात 20 व्या शतकाच्या अखेरीपर्यंत होत असे मात्र छपाईच्या दृष्टीने मोडी लिपीची मर्यादा सिमीत झाल्याने कालाघात ही लिपी हळूहळू मागे पडली. राजदराबारातून नव्हेतर व्यवहारी जिवनातूनही मागे पडली. इतकेच नव्हेतर ती हळूहळू मोडीत गेल्यातच जमा झाली.

तरी 12 व्या शतकापासूनच्या या मोडी लिपीचा अभ्यास करून घेणेसाठी शेंदुर्णी येथे आयोजित मोडी लिपी प्रशिक्षण वर्गाचा लाभ जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कर्मचाऱ्यांनी घ्यावा, तसेच अधिक माहितीसाठी पुराभिलेख संचालनालय, मुंबई या कार्यालयाच्या 022-22844268 / 022-22843971 या दुरध्वनीवर संपर्क साधावा, असे आवाहन संचालक, पुराभिलेख संचालनालय, महाराष्ट्र शासन, मुंबई यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
******

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

eleven − seven =